डोंबिवली दि.१२ - गेली ४० ते ५० वर्ष सिद्धार्थनगर ही झोपडपट्टी डोंबिवलीत अस्तित्वात आहे. सुमारे आठशे ते हजार घरे येथे असून आज सायंकाळी डोंबिवली आरपीएफ रेल्वे पोलिसांच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशानुसार झोपडपट्टी पाडण्याची कारवाई करण्यात येईल, त्यासाठी २५ तारखेला घरे रिकामी करावीत अशी सूचना ध्वनीक्षेपकावर दिल्याने हवालदिल झालेल्या नागरिकांनी डोंबिवली पूर्वेकडील आरपीएफ कार्यालयावर धाव घेतली.
सुमारे ५०० महिला व नागरिक यांनी रेल्वेचा यावेळी निषेध केला. रेल्वेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशोदा यादव तसेच पोलीस निरीक्षक सुहास मनोहर यांनी सिद्धार्थ नगर येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याबाबत वरिष्ठांना कळवू असे सिद्धार्थ नगर मधील नागरिकांना आश्वासन दिले. सिद्धार्थ नगरच्या वतीने पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे आणि इतर कार्यकर्त्यांनी आरपीएफ च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जोपर्यंत पर्यायी घरांची व्यवस्था होणार नाही. तोपर्यंत एकही घर तोडले जाणार नाही. पर्यायी घरांची व्यवस्था करा अन्यथा त्यांना योग्य मोबदला द्या ही मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
माणिक उघडे, शिवा पवार, राजू गरुड, आनंद नवसागरे विकास खैरनार, कपिल सोनवणे , शारदाबाई पवार, ताईबाई नेरकर, सुनिता सोनवणे, सुरेखा गरुड, वैशाली सावर्डेकर, शोभाताई साबळे, आम्रपाली सोनवणे, पल्लवी खैरनार, लखन खेडकर, अर्चना शेलार, विद्या खैरनार यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा