BREAKING NEWS
latest

रेकॉर्डवरील नामचीन तडीपार गुंडास गुन्हे शाखा युनिट-३ च्या पोलीसांनी केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली:  कल्याण क्राईम ब्रँचच्या युनिट-३ शाखेचे पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांना त्यांचे गुप्त बातमीदरामार्फत बातमी मिळाली की, डोंबिवली पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील नामचीन तडीपार केलेला गुंड सागर काशिनाथ दाते उर्फ डोळा हा डोंबिवलीतील दत्तनगर येथील प्रगती कॉलेजच्या समोर गार्डन जवळच्या परिसरात हातात भला मोठा धारदार कोयता घेऊन फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच कल्याण क्राईम युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना कळविताच त्यांनी तात्काळ त्याचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणे जाऊन कारवाई करण्याचे आदेश पथकातील स.पो.निरी. संतोष उगलमूगले, संजय माळी, पो.हवा.दत्ताराम भोसले, विश्वास माने, बालाजी शिंदे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग या पथकास दिले. 

लागलीच मिळालेल्या गुप्त  बातमीवरून सदर ठिकाणी विलंब न करता लागलीच जाऊन डोंबिवली पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील हद्दपार (तडीपार) केलेला आरोपी सागर काशिनाथ दाते उर्फ डोळा (वय: २८ वर्षे) राहणार डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील प्रगती कॉलेज जवळ, हा पोलीसांना पाहून धूम ठोकत असताना त्याचा पाठलाग करून त्यास घातक हत्यार धारदार कोयत्यासह पकडले व सदर हद्दपार (तडीपार) गुंड यास कल्याण-डोंबिवली परिमंडल-३, मधून दि. ०६/०६/२०२३ रोजी पासून १८ महिन्या करिता हद्दपार (तडीपार) केले असून याचे वर घातक शास्त्राने वार करून दहशत माजवणे असे ३ गुन्हे, तसेच एन.डी.पी.एस.चा १ गुन्हा असे एकूण ४ गुन्हे डोंबिवली पोलीस स्टेशन च्या रेकॉर्डवर त्याच्या विरोधात दाखल असून त्याचे विरुद्ध डोंबिवली पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कारवाई करून ताब्यात देण्यात आले आहे. तसेच वरील तडीपार गुंडास कल्याण गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पोलिसांनी त्यास पकडून कारवाई केल्यामुळे सदर भागातील जनतेकडून गुन्हे शाखेच्या पोलीसांनी केलेल्या  उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक होत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत