BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील जन गण मन शाळेला 'स्टार्टअप इंक्युबेटर सेंटर' सुरू करण्यास केंद्र सरकारची मान्यता..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०९ : डोंबिवली पश्चिमेकडील प्रख्यात 'जान्हवी मल्टी फाउंडेशन' च्या 'जन गण मन' शाळेचा १६ वा 'प्रेरणोत्सव २०२३-२०२४' एमआयडीसीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संपन्न झाला. त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन करणारे जयेश खाडे उपस्थित होते. 
शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मुलांच्या व्यवसायिक कौशल्याला वाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने 'स्टार्टअप इंक्युबेटर (नवजात अर्भकांसाठी काचेची संरक्षित पेटी) सेंटर'ला परवानगी दिली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील प्रख्यात जन गण मन शाळेत या महिन्यात हे 'इंक्युबेटर सेंटर' सुरु होणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विशिष्ट क्षेत्रात सखोल काम करायचे असेल तर त्याला भरघोस शिष्यवृत्ती देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. कल्याण-डोंबिवलीतील या पहिल्या इंक्युबेटर सेंटरसाठी कल्याण-डोंबिवलीतून २० ते २२ शाळांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठविले होते. मात्र या जनगणमन शाळेने प्रस्तावाबरोबर पाठवलेले ४० प्रकल्प विशेष उल्लेखनीय ठरल्याने शाळेला हा बहुमान मिळाला आहे. या शाळेत जापानी आणि जर्मनी भाषा देखील शिकवली जाते.
स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन करणारे जयेश खाडे या 'इंक्युबेटर सेंटर' (नवजात अर्भकांसाठी काचेची संरक्षित पेटी) मधून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याबाबत अधिक माहिती देताना 'जेएमएफ' शाळेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे म्हणाले, या सेंटरमध्ये विद्यार्थ्यांच्या आकर्षक कल्पनांना वाव देण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. 'स्टार्टअप इंक्युबेटर सेंटर'मुळे भविष्यातील उद्योजक येथे घडू शकतील व ते फक्त नोकर म्हणून न राहता नोकऱ्या उपलब्ध करून देणारे उद्योजक म्हणून घडतील. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना खाडे म्हणाले, स्टार्टअपमध्ये बऱ्याच योजना आहेत ज्या सर्वसामान्य लोकांना माहीत नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये अनेक अद्भुत  कल्पना असतात. मात्र त्या कुठे सादर करायच्या ? त्याचा भविष्यात कसा फायदा होईल ? याची माहिती नसते. अशा विद्यार्थ्यांनी स्टार्टअपच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे. 
तसेच शाळेच्या सचिव प्रेरणा कोल्हे म्हणाल्या, जन गण मन शाळेत जानेवारी महिन्यात सुरु होणाऱ्या 'स्टार्टअप इंक्युबेटर सेंटर'शी विद्यार्थ्यानी संपर्क साधावा. यासाठी कोणतीही रजिस्ट्रेशन फी नाही. यावेळी 'जेएमएफ मुव्हीज'च्या संस्थापक जान्हवी कोल्हे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना भविष्यात आपले करीयर करण्यासाठी 'स्टार्टअप इंक्युबेटर सेंटर' आवश्यक आहे.
'प्रेरणोत्सव २०२३-२०२४' च्या कार्यक्रमादरम्यान शाळेचे संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे, सचिव प्रेरणा कोल्हे व 'जेएमएफ मुव्हीज' च्या संस्थापक जान्हवी कोल्हे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार दिनानिमित्त डोंबिवलीतील पत्रकारांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यात राष्ट्रीय पदक विजेता पत्रकार व केंद्रीय पत्रकार संघाचे तालुका संघटक अवधुत सावंत यांचा विशेष स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच डोंबिवली पत्रकार संघाच्या अध्यक्षा राजलक्ष्मी पुजारे, सचिव प्रशांत जोशी, महावीर बडाला, शंकर जाधव, नरेंद्र थोरावडे, बजरंग वाळुंज, जान्हवी मौर्य, आयुषी विचारे, सोनल सावंत, अनघा पाटील, अभिजित पवार, संतोष सावंत, आरती मुळीक परब, मीनल पवार यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. डोंबिवली पत्रकार संघाच्या अध्यक्षा राजलक्ष्मी पुजारे यांनी जन गण मन शाळेचे संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे यांचे आभार मानत शाळेच्या पुढील उपक्रमांना पत्रकार संघातर्फे शुभेच्छा दिल्या.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत