BREAKING NEWS
latest

'युथ डे' निमित्त 'जेके स्टार्टअप सपोर्ट सेंटर' च्या माध्यमातून जन गण मन शाळेत कल्पना स्पर्धेचे आयोजन करून साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.१२: आज 'युथ डे' च्या निमित्ताने 'जेके स्टार्टअप सपोर्ट सेंटर च्या माध्यमातून डोंबिवली पश्चिमेकडील 'जन गण मन शाळा आणि वंदे मातरम कॉलेज' मध्ये युवा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून फाउंडर ऑफ 'जेके स्टार्टअप सपोर्ट सेंटर' ऍन्ड मेन्टॉर फॉर 'ईसेल आयआयटी बॉम्बे' चे जयेश खडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विध्यार्थ्यांना शिक्षण घेताना नुस्तं पुस्तकी शिक्षण न घेता 'स्किल बेस एड्युकेशन', 'इंक्यूबेशन सेंटर स्टार्टअप', संबंधी मोलाचे मार्गदर्शन केले. आणि विशेष म्हणजे शाळेतील आठवी, नववी, दहावीतल्या मुलांकरिता त्यांनी 'स्टार्टअप आयडिया' वरती स्पर्धा ठेवली होती आणि त्यामधे शाळेतल्या मुलांनी यांच्या कल्पना उघडपणे बोलून दाखवल्या. 
काही मुला-मुलींनी स्टॉक मार्केट मध्ये शेयर मार्केट मधील ट्रेडिंगची उलाढाल तसेच दीर्घकाळ गुंतवणुकीबद्दल भाष्य केले. एका आठवीतल्या मुलीने सांगीतले की आतापासूनच ती शेयर मार्केट मध्ये  निफ्टी व फिफ्टी फिफ्टी च्या निवेशामध्ये मध्ये १०,००० रुपयांची दीर्घकाळा करीता गुंतवणूक करून पैसे कमावण्याची संधी साधत असून ती दर दरमहा ५०० ते ६०० रुपये कमवते.आताच्या शिकलेल्या पिढीला कोणावरही निर्भर न राहता आपण स्वतंत्र राहावे हे तिचे विचार ऐकून ह्या वयात शाळेतील आठवीच्या मुला-मुलींना असलेल्या ज्ञानाबाबत जयेश खाडे यांनी आश्चर्य व्यक्त करत मुलांचे  कौतुक केले व ते म्हणाले की सांगायला खूप आनंद होतो की, या वयातील शाळेतल्या मुलांनी स्टॉक मार्केट, निफ्टी, शेयर मार्केट, म्युच्युअल फन्ड ट्रेडिंग, एसआयपी, बँकिंग याची बऱ्यापैकी माहिती असून ते पुढे म्हणाले की इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट न करता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा असा सल्ला देत शाळेत खूप चांगला कार्यक्रम झाला. असेच कार्यक्रम आपल्या इथे ठाणे जिल्ह्यामध्ये तसेच डोंबिवलीमध्ये व इतर  दुसऱ्या शाळांकॉलेजमध्ये झाले पाहिजेत. 'उद्योजकता विकास कार्यक्रम' शालेय विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, आपल्या इकडच्या रहिवाश्यांसाठी असे जास्तीत जास्त कार्यक्रम करून 'नोकरी मागणारे नाहीत तर नोकरी देणारे उद्योजक' झाले पाहिजेत आशा प्रारचे कार्यक्रम राबवायला  पाहिजेत.
यावेळी 'युथ डे' निमित्त 'जन गण मन शाळा आणि वंदे मातरम कॉलेज' मध्ये 'स्टार्टअप आयडिया' वरती घेतलेल्या कल्पना स्पर्धेमध्ये शाळेतील ज्या मुला-मुलींनी सहभागी होऊन त्यांच्या विविध कल्पना प्रदर्शित केल्या त्या मुला-मुलींना फाउंडर ऑफ 'जेके स्टार्टअप सपोर्ट सेंटर' ऍन्ड मेन्टॉर फॉर 'ईसेल आयआयटी बॉम्बे' च्या जयेश खाडे यांच्यातर्फे त्या मुलांना त्यांच्याकडून आकर्षक गिफ्ट म्हणून महागड्या ब्रँडेड लेदर बॅग्स बक्षीस म्हणून देऊ केल्या.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत