संतोष औताडे- नेवासा दिनांक -10/01/2024
सविस्तर माहिती- जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर पुरस्कृत व महाराष्ट्र उधोजकता विकास केंद्र आयोजित मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच शेवगाव येथील शितीज सोशल फाउंडेशन सिद्धिविनायक कॉलनी शेवगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. आज दिनांक 08 जानेवारी 2024 रोजी या मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या प्रशिक्षणासाठी शितिज सोशल फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्याची सुवर्ण संधी जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर व महाराष्ट्र उधोजकता विकास केंद्राने दिली आहे.या संधीचा लाभ घेऊन महिलांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी तसेच परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन तात्यासाहेब जिवडे प्रकल्प अधिकारी जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर यांनी केले आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, व जिल्हा उद्योग केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण ट्रेनर म्हणून तपाडीया मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रशिक्षामुळे ग्रामीण भागातील महिलांना उद्योजक होण्याची संधी मिळेल. केवळ प्रशिक्षण न देता महिलांना बाजार पेठ, मार्केटिंग,याचा सर्व्हे करून आपला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी हे प्रशिक्षण महिलांना नक्कीच लाभदायी ठरनार आहे. या मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणासाठी परिसरातील महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या प्रशिक्षण कार्यक्रम शिबिरासाठी संतोष औताडे (पञकार) कार्यक्रम समन्वयक जिल्हा उद्योग केंद्र MCED अहमदनगर हे काम बघत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा