BREAKING NEWS
latest

भाजपच्या माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या प्रभागात 'विकसित भारत संकल्प यात्रा' चे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: केंद्र शासन आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका,आरोग्य विभाग यांच्या वतीने पालिकेच्या नवनियुक्त आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनानुसार पालिकेच्या सर्व प्रभागात विकसित भारत संकल्प यात्रा चे आयोजन करण्यात येत असून भाजपच्या माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या डोंबिवली पश्चिमेकडील जनसंपर्क कार्यालयाच्या पटांगणात विकसित भारत संकल्प यात्रा चे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी महाराष्ट्रातल्या गरीब कुटुंबातील महिला प्रत्येक गरजेसाठी इतरांवर निर्भर होत्या. या महिलांना निरोगी बनवले जात आहे आणि मोफत अन्न धान्याने प्रधानमंत्री कल्याण अन्न योजनेने महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना समृद्ध आणि त्यांना भोजन सुनिश्चित केले जात आहे. केंद्र सरकारच्या 'हर घर जल' योजनेअंतर्गत १३.५ कोटींपेक्षाही अधिक ग्रामीण कुटुंबांना नळातून शुद्ध पाणी मिळत आहे. महाराष्ट्रातले ग्रामीण आपल्या पक्के घराचे केवळ स्वप्न पहात होते. संकल्प होता लोकांना त्यांच्या स्वतःच्या घराचे मालक बनवावे. आज महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४ कोटींपेक्षा अधिक घरांचा निर्माण करून वीस लाखात ते स्वप्न पूर्ण करता येईल. 
या 'संकल्प विकसित भारत' यात्रे अंतर्गत मोदी सरकारची हमी, आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना, ४८ लाखाहून अधिक एलपीजी कनेक्शन्स चे वितरण, प्रधानमंत्री आवास योजना, विद्युत विभागातर्फे सौर ऊर्जा एकच पर्याय, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीअंतर्गत ११ कोटींपेक्षा अधिक लाभार्थी, प्रधानमंत्री जणधन योजनेअंतर्गत ५० कोटींहून अधिक लाभार्थी असल्याची माहिती चित्रफितीद्वारे नागरीकांना देण्यात आली. तसेच आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना (आभा) कार्ड ची नोंदणी करून सर्वांसाठी ५ लाखांपर्यंत निशुल्क उपचार  त्याची माहिती व फायदे नागरिकांना समजाविण्यात आले. 
या प्रसंगी आयुष्यमान भारत आरोग्य शिबीर देखील भरविण्यात आले होते. त्यात मधुमेह, रक्तदाब, क्षयरोग सारख्या असाधारण आजारांच्या रक्त चाचण्या देखील करण्यात आल्या. स्वतः माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी आपली रक्त चाचणी करून घेतली. यावेळी 'ह' प्रभाग क्षेत्राच्या उपयुक्त स्नेहा करपे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका माहिती जनसंपर्क अधिकारी माधवी फोपळे, जयराम शिंदे, विजय भोईर तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत या आयुष्यमान भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम राबविण्यात आला.
तसेच नवनियुक्त आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनानुसार 'विकसित भारत संकल्प यात्रा' चे आयोजन एमआयडीसीतील योगेश म्हात्रे यांच्या प्रभागात कावेरी चौक येथे १० (ई) प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. त्यावेळी आरोग्य शिबिरात स्वतः योगेश म्हात्रे यांनी आपली रक्तदाब चाचणी करून घेतली. यावेळी परिसरातील प्रकाश म्हात्रे, सर्जेराव जाधव तसेच शेकडो नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत