भारताच्या सर्वात मोठ्या प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ चे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य दिव्य अश्या प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ चे प्रदर्शन दिनांक २६ ते २८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ०८:०० वाजेपर्यंत असणार आहे. या एक्स्पोचा महत्वाचा उद्देश "जीरो इज अवर हीरो" असा आहे. या थीम अंतर्गत घरांच्या विक्रीसाठी लागणारे स्टॅम्प ड्युटी आणि रेजिस्ट्रेटेशन शुल्क कशा प्रकारे निशुल्क करता येईल यावर लक्ष केंद्रित असणार आहे.
क्रेडाई-एमसीएचआई च्या 31 व्या आवृत्ती दरम्यान या एक्स्पो ची घोषणा करण्यात आली असून या मध्ये १०० हुन अधिक दिग्गज विकासक तसेच हजारोंच्या संख्येनं प्रॉपर्टीचे प्रदर्शन होणार असल्याचे कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले आहे.
दरम्यान एक्स्पो मध्ये येणाऱ्या सर्व व्हिसिटर्ससाठी मोफत रजिस्ट्रेशन सुविधा देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा