मुंबई : राष्ट्रवादी महीला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी नुकतेच सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष पदी संगीता जोगधनकर तसेच कार्याध्यक्ष पदी चित्रा कदम यांची नियुक्ती केल्याचे पत्र माध्यमातून जाहीर केले.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी रूपालीताई चाकणकर यांनी केल्या. पक्षाचे विचार पक्षाचे ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्षाचा प्रचार आणि प्रसार करून पक्ष कार्य अधीक गतीमान होण्याच्या दृष्टीने अध्यक्ष कार्याध्यक्ष हे प्रयत्न करतीलच त्याच बरोबर महीला संघटन मजबूत करून अजित पवार यांचे हात बळकट करण्याच्या शुभेच्छा रूपालीताई यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना दिल्या.
त्याच बरोबर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला निरीक्षक दिपाली पांढरे यांनी या निवडीबद्दल दोन्ही पदाधिकाऱ्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वात सोलापूर शहरात अतिशय चांगले संघटन उभे करून महिला आघाडी शहराध्यक्ष कार्याध्यक्ष अतिशय मजबूत करतील असी खात्री असुन आपण पुढे वाटचाल करीत असताना सर्व सहकारी महिला पदाधिकारी यांना सोबत विश्वासात घेऊन आपण कार्य कराल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या आपल्या कार्यात माझं मार्गदर्शन तर राहीलच त्याच बरोबर सक्रिय सहभाग आणी साथ देखील असेल अशा शुभेच्छा निरीक्षक यांनी दिल्या.
संगीता जोगधनकर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस फादरबाॅडी मध्ये सरचिटणीस या पदावर कार्यरत होत्या. तसेच त्या वीरशैव कक्कय्या समाज महिला संस्थापिका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तर चित्रा कदम ह्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस मध्ये गेली अनेक वर्ष शहर सचिव या पदावर सक्रीय काम करीत होत्या.
नुतन महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम यांचे राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान गटनेते किसन जाधव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल सर्व महिला पदाधिकारी यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व फ्रंट सेल आणि पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा