BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील 'वर्धमान महोत्सव' निमित्त राष्ट्रसंत आचार्य श्री महाश्रमणजी यांचे 'जन गण मन' शाळेत आगमन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक २७ जानेवरी रोजी डोंबिवलीतील 'वर्धमान महोत्सव' निमित्त 'जे एम एफ' संस्थेत महान तपस्वी जैन मुनी श्री आचार्य महाश्रमणजी यांचे पावन आगमन झाले. आचार्य श्री महाश्रमणजी जागतिक अणू व्रत आंदोलन चालवतात. व्यवहार शुध्दी, नैतिकता, प्रामाणिकपणा व संयम यांचं हे आंदोलन करण्यात आले.
प्रथमतः स्वतःचा प्रामाणिकपणा, कुणालाही न फसवणे, अहिंसा परमो धर्मा : ह्या धर्मांचे  पालन करा, त्याच बरोबर भ्रमणध्वनी (मोबाईल) मधे जास्त वेळ न घालवता वाचन करा व रात्री  लवकर झोपून सकाळी सूर्योदयापूर्वी उठा व संध्याकाळी सूर्यास्त पूर्वी भोजन करा असे मार्गदर्शनपर वक्तव्य आचार्यांनी केले. अनेक विद्यार्थ्यांनी कुतूहलाने त्यांच्या जीवनचर्या  बाबत अनेक प्रश्न आचार्यांना विचारले, व त्यांनी ही उत्साह पूर्वक मुलांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. सर्व मुलांनी अणूव्रत गीत व विज्ञान गीत गायले.
संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. सौ प्रेरणा कोल्हे यांनी आचार्य महाश्रमणजी तसेच सर्व धर्म प्रसारक मंडळी व त्यांचे शिष्य यांचे स्वागत करून स्थान ग्रहण करविले. महान संताचे चरण आपल्या शाळेला लाभले म्हणजेच त्यांचा आशीर्वाद मिळाला आहे हे आपले भाग्य च म्हटले पाहिजे, असे डॉ.राजकुमार कोल्हे यांनी वक्तव्य केले. सर्व मुलांनी सतत जिज्ञासा जागृत ठेऊन पुढील वाटचाल करावी व संतांचे आचरण करावे असे डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी उपदेशन केले. यावेळी मुलांनी सशक्त व निरोगी राहण्याकरिता योग प्रात्यक्षिकं सुद्धा करून दाखवली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत