BREAKING NEWS
latest

मराठी भाषा दिवसानिमित्त 'माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्यातील स्थान' या विषयावर खुली लेख स्पर्धाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई: मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर जन्मदिन आणि 'मराठी भाषा दिवस' दरवर्षीप्रमाणे मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. यावेळी ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिवंगत कामगार नेते वसंतराव होशिंग यांच्या स्मरणार्थ मुबंईसह संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्र लेखक, निवृत्त व सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक, शिक्षक, साहित्यिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, मराठी भाषाप्रेमी यांच्यासाठी विनामूल्य 'माझ्या मायबोलीचे मराठी साहित्यातील स्थान' या विषयावर १२०० शब्दमर्यादा असलेली खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची घोषणा संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केली आहे. कोस कोसावर बदलणाऱ्या महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषांनी आपली मराठी भाषा समृद्ध झाली आहे. खेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते, कशीही असो ती 'मराठी' च म्हणून मराठी माणसाला आवडते. 

बोलीभाषेतील साहित्यकृतींचा धांडोळा घेत स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी लेख लिहावा यावा अशी अपेक्षा आहे,  पहिल्या ५ जणांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व इतरांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. युनिकोड फॉंट मध्ये टाईप करून दि १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत लेख  <chalval1949@gmail.com> या ईमेलवर पाठवावेत तसेच स्पर्धेची अधिक माहिती, नियमावली व आगावू नोंदणी करण्यासाठी स्पर्धा समन्वयक राजन देसाई, भ्रमणध्वनी: ८७७९९८३३९० यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त ऍड.देवदत्त लाड, विकास होशिंग, संजीव गुप्ते यांनी केले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत