BREAKING NEWS
latest

कडोंमपा महापालिका मुख्यालय व महापालिकेच्या विविध प्रभागात 'राष्ट्रीय मतदार दिन' आज मोठ्या उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण, दि.२५: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत राष्ट्रीय मतदार दिन आज उत्साहात संपन्न झाला. निवडणूक प्रक्रियेतील नागरीकांचा तसेच मतदारांचा सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून जनजागृती होण्यासाठी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांस आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, शपथ देऊन मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ व अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य लेखा परिक्षक लक्ष्मण पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, सहाय्यक संचालक नगररचना दिशा सावंत, महापालिका सचिव तथा उपायुक्त वंदना गुळवे, उपआयुक्त अर्चना दिवे, धैर्यशील जाधव, स्वाती देशपांडे, अवधुत तावडे, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, योगेंद्र राठोड, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी देखील मतदार दिनानिमित्त शपथ घेतली.
त्याचप्रमाणे महापालिकेच्या इतर विभागात तसेच सर्व प्रभागातही संबंधित सहा.आयुक्त यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांनी देखील राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेतली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत