BREAKING NEWS
latest

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनंतर ५७ मुस्लिम राष्ट्र संतप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. या सोहळ्याची देशभरात जोरदार चर्चा झाली. यानंतर आता 'ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन'ने सोमवारी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. इस्लामिक स्थळ बाबरी मशीद पाडून बांधलेल्या या मंदिराचा आम्ही निषेध करतो, असे ओआयसीने निवेदन जारी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी अयोध्येत राम ललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याचे केंद्रबिंदु आणि प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिराच्या उद्घाटनाचा तीव्र निषेध केला, ६ डिसेंबर १९९२ रोजी भारतातील सर्वात मोठ्या न्यायालयाने किंवा या घटनेला जबाबदार असलेल्यांना निर्दोष ठरवले, आणि मंदिर त्याच ठिकाणी बांधण्यास मान्यता दिली, हे निषेधार्ह आहे. आता ओआयसीनेही अशीच प्रतिक्रिया दिली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत