BREAKING NEWS
latest

'पोलीस वर्धापन दिन' सप्ताह निमित्त डोंबिवलीत "हॅप्पी स्ट्रीट" चे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०७: पोलीस आयुक्तालय ठाणे अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभागातर्फे 'पोलीस वर्धापन दिन सप्ताह' निमित्त डोंबिवलीकरांसाठी "हॅप्पी स्ट्रीट" या कार्यक्रमाचे आज रविवार दिनांक ०७/०१/२०२४ रोजी सकाळी ६ ते ९ वाजेच्या दरम्यान आप्पा दातार चौक, फडके रोड डोंबिवली (पूर्व) येथे आयोजन करण्यात आले.
सदर फडके रोडवरील 'हॅप्पी स्ट्रीट' या कार्यक्रमात झुम्बा डान्स, क्रिकेट, स्केटिंग, रांगोळी, रोपवे योगा, मल्लखांब, ओपन जिम, कॅरीओके गाणी, फुटबॉल, लेझीम, लहान मुलांसाठी खेळणी, ३६० डिग्री सेल्फी पॉईंट, स्ट्रीट पेंटिंग, कॅलिग्राफी, डॉग शो, लाठी-काठी, दांडपट्टा, स्वरक्षणाकरिता जुडो-कराटे ची प्रात्यक्षिके, खेळाचे व मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच वाहतूक नियमांचे व्यंगचित्राच्या माध्यमातून संदेश देणारे चित्र प्रदर्शन, पोलीस शस्त्र प्रदर्शन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'सायबर क्राईम फ्रॉड' वर पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच 'पेसमेकर डान्स अकॅडमी' तर्फे मुलांची नृत्य सादर करण्यात आली. पोलिसांनी आयोजित केलेल्या या 'हॅप्पी स्ट्रीट' कार्यक्रमामुळे फडके रोड परिसराला पोलीस छावणी चे स्वरूप आले होते. डोंबिवलीतील हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचा आनंद घेतला.
यावेळी कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या व लहान मुलांच्या हस्ते अवकाशात फुगे सोडले त्यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख व जिल्हा समन्वयक महेश पाटील, शहर अध्यक्ष राजेश मोरे, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, उपतालुका प्रमुख गजानन पाटील, युवासेना शहर अधिकारी सागर जेधे, कार्यालय प्रमुख प्रकाश माने, उपकार्यालय प्रमुख धर्मराज शिंदे, सहकार्यालय प्रमुख सागर बापट, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक नितीन मट्या पाटील, डोंबिवली विधानसभा सचिव संतोष चव्हाण, अभिजीत दरेकर, जितेन पाटील, भाजपा १४४ - कल्याण जिल्हा विधानसभा निवडणूक प्रमुख व कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर (नंदु) परब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस, कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ चे सचिन गुंजाळ, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि.अशोक होणमाने, रामनगर डोंबिवली पोलीस ठाण्याचे वपोनि. नितीन गीते, विष्णू नगर पोलीस ठाण्याचे वपोनि. मोहन खंदारे, डोंबिवली वाहतूक शाखेचे वपोनि. अजय कल्याण आफळे तसेच डोंबिवलीतील चार पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनीदेखील या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनी टीव्ही वरील 'सीआयडी'  मालिकेतील सिने कलाकार सतीश नायकोडी यांनी केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत