BREAKING NEWS
latest

"मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण"

मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांच्या विशेष प्रयत्नाने बाल विकास विद्या मंदिर, जोगेश्वरी (पूर्व) शाळेतील पूर्व प्राथमिक विभागाच्या पालकांसाठी *मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम उपस्थित पालकांचे स्वागत करून आपल्या मुलांना मराठी माध्यमातून प्रवेश घेऊन त्यांनी घेतलेला निर्णय किती अचूक योग्य आहे. याचे महत्त्व सांगण्यात आले. 

  जपान, फ्रान्स जर्मनी या तीन देशातील मुले जगावर राज्य करतात. कारण या देशातील पालक आपल्या मुलांना मातृभाषेतून शिकवितात. हाच मुद्दा अधोरेखित करून उपस्थित पालकांनी घेतलेला मराठी माध्यमाचा निर्णय हा अत्यंत बरोबर व मुलांच्या मानसिकतेला धरून आहे याबाबत संकल्प संस्थेचे अध्यक्ष विष्णू बाळ धुरी सरांनी मार्गदर्शन केले. इंग्रजी बोलण्याचा आणि बुद्धिमत्तेचा काडीचाही संबंध नाही हे याच शाळेतील अनेक माजी विद्यार्थी जे आज डॉक्टर, इंजिनिअर, सीए होऊन देशा परदेशात स्थायिक झाले आहेत त्यांची माहिती देण्यात आली. जी भाषा घरात बोलली जाते त्याच भाषेतून जर मुलांना शिकविले गेले तर मुलांचा केवळ बौद्धिक विकास नव्हे तर आत्मिक विकास सुद्धा होतो हे पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. "टिकवायचं जर असेल मुलांचं बालपण...तर मुलांना द्यायलाच हवे मातृभाषेतून शिक्षण," ही गोष्ट समस्त पालकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. घराबाहेर पडल्यावर भेटणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी पालकांनी सुरुवात मराठीतूनच करावी अस वचन उपस्थित पालकांकडून घेण्यात आले.


संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनी मातृभाषेचे महत्त्व व त्यासोबतच विद्यार्थी, महिलांनी सुरक्षिततेच्याबाबत नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत अचूक मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मुख्याध्यापिका सुविधा शिर्के यांच्या मार्गदर्शनाने शिक्षिका स्मिता मोरे व
स्नेहल गावडे यांनी यशस्वीपणे पार पाडली. उपक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत