BREAKING NEWS
latest

'एक लाख, अकरा हजार, एकशे अकरा' दिव्यांचा डोंबिवलीत होणार विश्वविक्रमी दीपोत्सव..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली:  प्रभु श्री रामाच्या अयोध्येतील मंदिराचे उ‌द्घाटन २२ जानेवारी रोजी होत असून, त्यानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात विश्वविक्रमी दिपोत्सव साजरा केला जाणार आहे. लोकसभेचे संसद रत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने २१ जानेवारी रोजी डोंबिवलीतील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात १ लाख ११ हजार १११ दिव्यांमधून प्रभु श्री रामाचे चित्र साकारले जाणार आहे. या दिपोत्सवाची विश्वविक्रम म्हणूनही नोंद केली जाणार आहे. यावेळी महाआरतीसह कल्याण लोकसभा मतदार संघात नऊ ठिकाणी आकर्षक अशी दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. २१ जानेवारी रोजी होणारा या दीपोत्सवाची विश्वविक्रम म्हणून नोंद केली जाणार आहे. त्यासाठी तयारी करण्यात आली असून, हा दिपोत्सव देशातील सर्वात मोठा दिपोत्सव ठरण्याची आशा आहे. इंडिया वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी या दिपोत्सवाच्यावेळी मैदानात उपस्थित राहतील. 
विविध मंदिर, रस्त्यासह विद्युत रोषणाई केली जाणार

लोकसभा मतदारसंघातील पाच लाख कुटुंबापर्यंत साखर व डाळ  वस्तूंचे शिधावाटप केले जाते आहे. त्यात प्रभू श्री राम मंदिराची प्रतिकृती, पुस्तकांचे मंदिर, विविध दहा ठिकाणी विद्युत रोषणाई, रामायण कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिपोत्सव कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन खासदर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. यामध्ये ९० फिट रस्ता खारेगाव कळवा, कळवा नाका, शिळफाटा जंक्शन, फडके रोड डोंबिवली, चक्की नाका कल्याण, घरडा सर्कल डोंबिवली, सावळाराम क्रीडा संकुल डोंबिवली, गोल मैदान, चालीय मंदिर, झुलेलाल मंदिर उल्हासनगर, बायपास रस्ता शिवमंदिर अंबरनाथ या ठिकाणी ही विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

प्रभू श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले तेव्हा दिवाळी साजरी जरण्यात आली होती तशी पुन्हा एकदा दिवाळी साजरी करून तोंड गोड व्हावे म्हणून संपूर्ण लोकसभा मतदारसंघात लोकसभेचे लाडके कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने पाच लाख कुटुंबापर्यंत मोफत डाळ आणि साखरेचे शिधावाटप करण्यात येत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत