BREAKING NEWS
latest

कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या आदेशाकडे नगररचना विभागाचा कानाडोळा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेने बांधकाम परवानगी प्राप्त असलेल्या भूखंडाच्या  माहिती दर्शक फलक लावण्याच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. महानगरपालिके मार्फत विविध भूखंडांवर बांधकाम परवानगी देण्यात येते. प्रचलित विकास नियंत्रण नियमावलीनुसार अशी बांधकामे परवानगी प्राप्त असलेल्या भूखंडाच्या दर्शनी भागावर विकासकामार्फत वास्तुविशारदाचे नाव, बांधकाम परवानगी क्रमांक, रेरा रजिस्ट्रेशनचा तपशील व दिनांक तसेच संरचना अभियंत्याचे नाव व भूखंडाचा तपशील दर्शवणारे फलक लावणे बंधनकारक आहे. असे असताना कल्याण-डोंबिवलीतील अनेक विकासक या गोष्टीकडे कानाडोळा करीत असून नगर रचना विभागाचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

अशा प्रकारे सदरचे तपशील दर्शविणारे फलक दर्शनीय भागावर लावल्यास नागरिकांना देखील बांधकामाच्या अधिकृततेबाबतची सहजरित्या  खात्री होऊ शकते. अशा बांधकाम परवानगी प्राप्त असलेल्या भूखंडाच्या दर्शनीय भागावर पुढील तीन दिवसात असे माहिती फलक लावणेबाबतच्या सक्त सूचना नवनियुक्त महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिल्या आहेत. मात्र तीन दिवस उलटूनही अजूनही नवीन बांधमावर तशी माहिती फलकं लागलेले दिसून येत नाहीत.

विकासकांमार्फत अशा प्रकारे बांधकाम परवानगी तपशील दर्शविणारे फलक न लावल्यास सदरचे बांधकाम अनाधिकृत ग्राह्य धरून संबंधित प्रभाग अधिकारी कार्यालयामार्फत दंडात्मक, स्थगिती देण्याची व निष्कासित करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्याबाबत सक्त सूचना महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी नगररचना विभागाच्या सहा. संचालिका  सावंत यांना दिल्या आहेत. असे असताना महापालिका आयुक्तांच्या सूचनांचे पालन होत असताना दिसून येत नाही.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत