निळजे दि.१५: मकरसंक्रांत दिनी निळजे येथील मैदानावर टेनिस क्रिकेट सामन्यांच्या 'मकर संक्रात चषक-२०२४' चे भव्य आयोजन जय हनुमान क्रिकेट संघ निळजे व ग्रामस्थ मंडळ निळजे यांच्या वतीने करण्यात आले होते. यंदा जय हनुमान क्रिकेट मंडळाचे ५५ वे वर्ष होते. या स्पर्धेत ग्रामीणच्या ४८ संघांनी भाग घेतला होता. यावेळी झालेल्या ५ षटकांच्या अंतिम सामन्यांत 'वडवली बी' संघ व 'वाडेघर' संघात चुरशीची लढत झाली त्यात वडवली बी संघ अंतिम विजेता ठरत या संघाने 'मकरसंक्रांत चषक २०२४' व २ लाख रुपये रोख पारितोषिक पटकाविले. तर वाडेघर संघ उपविजेता ठरत त्यांना ट्रॉफी व १ लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या आडीवली तसेच चौथा क्रमांक पटकवणाऱ्या हेदुटने संघांना प्रत्येकी ट्रॉफी व ५० हजार रोख चे पारितोषिक देण्यात आले.
तसेच सामन्यांतील मालिकावीर 'वडवली बी' संघाच्या २४ वर्षीय हृतिक पाटील याला मालिकावीर चषक तसेच 'होंडा' कंपनीची मोटारसायकल माजी आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते बक्षीस म्हणून देण्यात आली. हृतिक पाटील याने आतापर्यंत १० बाईक जिंकल्या असल्याचे प्रसिध्दी माध्यमांना सांगितले.
यावेळी शिवसेनेचे कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख व जिल्हा समन्वयक महेश पाटील यांनी सुद्धा ग्रामीणचे क्रिकेट सामने पाहण्यास हजेरी लावली. तसेच माजी आमदार रमेश पाटील, जादूगर राम पाटील, राजेंद्र पाटील, भगवान पांडुरंग पाटील, बाळकृष्ण आंबो पाटील, शरद पाटील, विश्वनाथ रसाळ, काशिनाथ पाटील, तकदीर काळण, निवृत्ती पाटील, विकी रमेश पाटील, अनंता पाटील, गजानन मोतीराम पाटील, प्रकाश परशुराम पाटील, सुभाष अनंता पाटील, रोहित भोईर, हरेश चंद्रकांत पाटील, संजय भोईर, साईनाथ भोईर, भानुदास पाटील, अजय पाटील, नंदू खंडाळे, शिवा बनसोडे,आदी मान्यवर व बहुसंख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण व विजेता उपविजेता संघाचा यथोचित सन्मान चषक व रोख पारितोषिके देऊन करण्यात आला.
यावर्षी ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील ग्रामिणच्या विविध ४८ क्रिकेट संघाने सहभाग घेतला. मागील ५४ वर्षेंपासून गिरीधर मारुती पाटील, बबन कृष्णा रसाळ, बाळाराम शंकर पाटील, विशाल करसन पाटील, अजय रमेश पाटील, अजय एकनाथ पाटील, सीताराम धाको पाटील, सुरेश चंद्रकांत रसाळ, सोमनाथ जगन्नाथ पाटील, प्रकाश शांताराम पवार, संतोष पाटील, नितेश चंद्रकांत पाटील, दत्ता बाळाराम पाटील, नितेश नारायण पाटील, केतन राजेश पाटील, चेतन मल्हार पाटील, विकी विश्वनाथ पवार, श्रीराम शिवराम पाटील, संतोष सुरेश खुटारकर, तुषार गोपीनाथ पाटील, किरण बाळाराम पाटील, देवानंद नामदेव पाटील, विशाल गणेश पाटील, दत्ता अनंता पाटील, सागर सुनील रसाळ, विलास मारुती पाटील, सिताराम धाको पाटील, विशाल करसन पवार, सदानंद पाटील, श्रीधर पाटील, गोपीनाथ पाटील व इतर सदस्यांनी विशेष मेहनत घेतली व सामन्यांचे आयोजन उत्तमरित्या केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा