BREAKING NEWS
latest

घरफोडी करणाऱ्या आरोपीकडुन डोंबिवली पोलीसांनी १,१०,५००/- रुपये किंमतीचा मुददेमाल केला हस्तगत..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

 डोंबिवली: दिनांक २३/११/२०२३ रोजी १४:३० वा. चे सुमारास डोंबिवली पूर्वेकडील आयरेगाव येथील पाण्याच्या टाकीजवळील ज्योतीनगर झोपडपट्टी रुम नं.७२ येथील  फिर्यादी यांच्या राहत्या घरातून सोन्याचांदीचे दागीने, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण १,२०,५००/- रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यावरून रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाणे येथे गु.र.क्र:- ४६१/२०२३ कलम ३८० भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सपोनि. योगेश सानप, पोहवा. विशाल वाघ, सरनाईक, पोना.  कोती, पोअं. पोटे, सांगळे, यांनी तपासाच्या अनुशंगाने सदर गुन्ह्यातील आरोपी हा आयरेगाव ज्योतीनगर, डोंबिवली पुर्व येथे आल्याची गुप्त बातमीदाराच्या मार्फती माहीती प्राप्त झाल्यावरुन पोलीसांनी सदर आरोपी आकाश सोनु केदारे (वय: १९ वर्षे) धंदा: बेकार, राहणार: आयरेगाव ज्योतीनगर झोपडपट्टी यास पाठलाग करून ताब्यात घेतले. नमुद गुन्ह्याच्या अनुशंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक करून नमूद गुन्हयात चोरी केलेला १८,०००/- रु. किंमतीचे गोल आकाराचे ०६ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुमके, ४०,०००/- रू. किंमतीचे गळयातील ०६ ग्रॅम सोन्याचे गोल आकाराचे पेडल असलेले मंगळसुत्र, २५,०००/- रू.  किंमतीचे ०४ ग्रॅम वजनाचे ओम आकाराचे पेडल असलेली सोन्याची चैन, ३,०००/- रू.  किंमतीचे पायातील चांदीचे पैंजण, ४०००/- रू. किंमतीची लहान मुलीची चांदीची कंबरसाखळी, २,०००/- रू. किंमतीचे लहान मुलीची चांदीचे दोन जोड पैंजण, १८,५००/- रूपये किंमतीचा एक 'विवो' कंपनीचा वाय ३५ मॉडेलचा गोल्डन रंगाचा मोबाईल फोन असा १,१०,५००/- रूपये एकुण किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण चे सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, म.पो.नि. खापरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. योगेश सानप, पोहवा. विशाल वाघ, सरनाईक, पोना. कोती, पोअं. पोटे, सांगळे, यांनी यशस्वीपणे कामगिरी केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत