BREAKING NEWS
latest

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे ह्यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य तसेच भविष्यातील उत्तरोत्तर प्रगती व यशासाठी 'महामृत्युंजय अखंड शिवमंत्र-जप आणि हवन' चे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.० : कल्याण लोकसभेचे 'संसदरत्न' तसेच लोकप्रिय कार्यसम्राट खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या ४ फेब्रुवारी रोजी वाढदिवसाचे औचित्य साधुन डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण शिवसेनेच्या वतीने  खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे ह्यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य तसेच भविष्यातील उत्तरोत्तर प्रगती व यशासाठी, सागांव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे आज सकाळी ७.३० ते सायं ५.०० वाजेपर्यंत 'महामृत्युंजय अखंड शिव मंत्र-जप अनुष्ठान आणि होम हवन' सोहळ्याची डोंबिवली पूर्व विभागातील, मानपाडा पथावरील प्राचीन श्री पिंपळेश्वर मंदिरात यशस्वीपणे आयोजित करण्यात आला होता.
कल्याण लोकसभा मतदार संघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे ०४ फेब्रुवारी रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना डोंबिवली शहराच्या वतीने डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आज शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभावे यासाठी आणि होम हवन कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली शहरातील मानपाडा पथावरील प्राचीन श्री पिंपळेश्वर मंदिरात करण्यात आले होते. 
सदर शुभप्रसंगी अखंड शिवजप अनुष्ठान आणि होम हवन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हाप्रमुख गोपाळ  लांडगे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख महेश पाटील, तालुका सचिव बंडू पाटील, डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण, रवी मट्या पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ मामा पाटील, कार्यालय प्रमुख प्रकाश माने, मा. नगरसेवक संजय पावशे, नगरसेविका सायली संजय विचारे, अपर्णा संजय पावशे, संजय विचारे, उपशहरप्रमुख गजानन व्यापारी, उपशहर प्रमुख बाळा म्हात्रे, उपशहर संघटक सुदाम जाधव, उप शहर संघटक संतोष तळाशीलकर, उपतालुकाप्रमुख, माजी नगरसेवक पंढरी पाटील, विकास देसले, सहकार्यालय प्रमुख सागर बापट, सहकार्यालय प्रमुख बालन मोरे, धर्मराज शिंदे, डोंबिवली पूर्व महिला शहर संघटक स्वाती हिरवे, डोंबिवली पश्चिम महिला शहर संघटक केतकी पोवार, उपशहर संघटक प्रतीक्षा प्रकाश माने, विभाग प्रमुख अमोल पाटील, विभाग प्रमुख सतरपाल सिंग, विभाग प्रमुख अनिल म्हात्रे, उपविभाग प्रमुख अरविंद वत्रे, श्रीकांत कोडते, शाखाप्रमुख मिलिंद केळुसकर, महिला उपविभाग संघटक विद्या यशवंत भावसार, यशवंत भावसार आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने व श्रद्धेने तसेच भक्ती-भावाने आणि आनंदाने उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत