एखाद्याला आयुष्याची भेट देणे किंवा इतरांना जगण्यासाठी मदत करणे म्हणजे दान होय. दान हे नेहमी सत्पात्री व गरज असणा-या व्यक्तींना दिले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या सामर्थ्यानुसार दान केले पाहिजे. प्रामाणिकपणे शुध्द अंतःकरणाने दिलेले दान उपयुक्त ठरते. अशा विचाराने दिव्यांग,तृतीयपंथी, महिला ,युवक सक्षमीकरणा करीता कार्यरत असलेल्या समाजसेविका सुरक्षा शशांक घोसाळकर यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलाला आर्मी ऑफीसर म्हणून देशाच्या स्वाधीन केलेलेच आहे. स्वतःच्या 50 व्या वाढदिवसाला पतीकडून अनोखी भेट म्हणून आपल्या अवयवदानाचे संमतीपत्र मिळवून मरणोपश्चात सर्व अवयव दान केल्याचे इच्छापत्र दाखल करुन प्रत्यक्ष कृतीतून समाजाला अवयव दाना करीता आवाहन केले आहे. वय,जात,रंग किंवा धर्म यातील समानतेचे दान म्हणजेच अवयवदान. देहदान करणे ही आधुनिक चळवळ सुरू होणे आवश्यक आहे. अन्नदाना प्रमाणे देहदान करणे याविषयी अधिकाधिक प्रचार,प्रसार करणे आणि जनतेने त्यासाठी सकारात्मक होणे ही आधुनिक भारताची ओळख निर्माण होणे अत्यावश्यक आहे.
आपली नम्र,
सुरक्षा घोसाळकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा