BREAKING NEWS
latest

'टायटॅनिक' जहाज ११२ वर्षानंतरही या कारणामुळे समुद्रातून बाहेर काढता आले नाही..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक.१५ एप्रिल १९१२ रोजी समुद्रात टायटॅनिक जहाज बुडाले होते. जेव्हा टायटॅनिक हे जहाज तयार करण्यात आले होते तेव्हा हे जहाज पाण्यात कधीच बुडू शकत नाही असा दावा करण्यात आला होता. पण टायटॅनिक पाण्यात शिरल्यानंतर काही वेळातच बुडाले.

टायटॅनिकचे अवशेष शोधायला बरीच वर्षे लागली. तब्बल ७३ वर्षांनंतर १९८५ मध्ये टायटॅनिकचा अवशेष सापडला. ११२ वर्षांनंतरही टायटॅनिकचा माल पाण्याबाहेर काढता आला नाही. चला तर मग जाणून घेऊया यामागचे कारण काय आहे.

टायटॅनिक का बाहेर काढता आले नाही ?

टायटॅनिक बुडून इतकी वर्षे झाली तरीही ते अजूनही समुद्राच्या खोलवर आहे. ते अद्याप काढण्यात आलेला नाही. यामागील कारण म्हणजे टायटॅनिक इतके खोल बुडाले आहे की इतक्या खोलवर जाऊन त्याला परत आणणे आता शक्य नाही. इतकं जड जहाज बाहेर काढू शकणारी हायटेक पाणबुडी तयार करण्यात शास्त्रज्ञांनाही अद्याप यश आलेलं नाही. याचे आणखी एक कारण म्हणजे पाण्याचा दाब. पाण्याच्या दाबामुळे जहाजाचे वजन इतके वाढले आहे की ते बाहेर काढणेच शक्य नाही आणि यामुळेच टायटॅनिक जहाजाला आजतागायत पाण्याबाहेर काढता आलेले नाही.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत