डोंबिवली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युवक आघाडी) डोंबिवली शहर अध्यक्ष तरुणांचा बुलंद आवाज युवा खंबीर नेतृत्व, भावी नगरसेवक विकास खैरनार यांचा वाढदिवस रविवार दि. ४ फेब्रुवारी रोजी सायं ७ वाजता ज्येष्ठ रिपाई नेते माणिक उघडे यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुका २०२५ दरम्यान होणार असुन सध्या आम्ही महायुतीत सहभागी असल्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, संघर्षनायक रामदास आठवले यांच्या दूरदृष्टी त्यागी नेतृत्वाला आदर्श मानून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत रिपाइचे (आठवले) नगरसेवक निवडून जाण्याकरीता मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ ज्येष्ठ नेते पँथर माणिकराव त्रंबक उघडे यांनाच किमान निवडणुकी पुरते कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष करावे, कारण त्यांच्यामुळेच डोंबिवलीत रिपाई जिवंत तसेच अस्तिवात आहे, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगलें दिवस आल्या शिवाय राहणार नाहीत कारण माणिक उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरूण कार्यकर्ते घडले, आज या प्रामुख्याने रिपाइ झोपडपट्टी महासंघद्वारे झोपडपट्टीत सुधारणा तसेच रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी पुनर्वसन, हक्क अधिकार, दलीत वस्ती सुधारणा मोहीम, झोपडपट्टीतील तरुण शिक्षित होऊन मोठ्या उद्योगधंदा कडे वळून, कॉर्पोरेट क्षेत्रात नोकऱ्या मिळवून समाजाचे प्रतिनिधित्व करून शासनकर्ती जमात बनावे. बुद्ध, शिवराय, फुले, शाहु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळात प्रचार प्रसार करून रुजविण्यात आम्हाला यश येत आहे, मला हरण्याची भीती नाहीये कारण मी आज जे काही मिळवले ते कष्टाने मिळवले आणि पुढें समाजाचे नेतृत्व करणारच असा दृढ विश्वास, पँथर विकास खैरनार यांनी यावेळी व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी खैरनार यांना आपल्या मंगल वाणीतून शुभेच्छा दिल्या.
यावेळी बौद्ध धम्म परीषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यीक प्रा. शुक्राचार्य गायकवाड, थोर ज्येष्ठ विचारवंत एन.एस.भालेराव, अशोक पगारे, अशोक कापडणे, रिपाइ (आठवले) चें ज्येष्ठ नेते माणिकराव त्रिंबक उघडे, सुप्रसिद्ध कवी, निवेदक बी.आर पंचांगे, उद्योजक राणा शेठ, भाऊसाहेब बनसोडे, संजय मुरलीधर पवार, अशोक हिवाळे, संघटक तुकाराम मुरलीधर पवार, सचिन साळवी, सुप्रसिद्ध कॅमेरामन विजय रणदिवे, शशी पवार, लघुसूक्ष्म उद्योजक चंदुशेट ठुकरुल तसेच मोठया प्रमाणावर युवा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा