BREAKING NEWS
latest

इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरवण्याचे राज्य सरकारचे आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : राज्यात इयत्ता चौथी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळा सकाळी ९ वाजल्यानंतर भरावण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. याबाबतचा जीआर राज्य सरकारने काढला आहे. याबाबतच्या सूचना सरकारकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मुलांच्या झोपेबाबत चिंता व्यक्त करत शाळांच्या वेळा बदलण्यात याव्या अशा सूचना राज्यपालांनी दिल्या होत्या.

शालेय शिक्षण मंत्र्यांकडून याबाबत विचारविनिमय सुरू होता. मात्र आता याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याआधी प्राथमिक शाळा सकाळी ७ वाजता सुरू होत असत. मात्र यामुळे लहान मुलांच्या झोपेवर परिणाम होत होता. मुलांची नीट झोप न झाल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यात विनाअनुदानित, अनुदानित, सरकारी आणि खाजगी अशा मिळून एकूण १,१०,११४ शाळा आहेत. दरम्यान, सरकारने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील ६५ हजाराहून अधिक शाळांमध्ये होऊ शकते असे म्हटले जात आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत