BREAKING NEWS
latest

लोकल ट्रेनच्या इंजीन समोर लटकून लोकांचा धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पश्चिम बंगाल लोकल ट्रेनचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, आपण बांगलादेशमध्ये ट्रेनच्या छतावर आणि इंजिन समोर लटकून व बसून प्रवास करणाऱ्या लोकांचे व्हिडिओ पाहिले पण भारतात असे होऊ शकते का? असा विचार आपल्या मनात चालला असेल. व्हिडिओमध्ये प्रवासी ट्रेनसमोर लटकत आहेत, तर मोठ्या संख्येने लोक गेटवर लटकत प्रवास करत आहेत. व्हिडिओ पाहून लोक प्रश्न विचारत आहेत की भारतातही लोकं असा प्रवास करतात का? हा व्हिडिओ खरा असेल तर रेल्वेमंत्र्यांनी कारवाई करावी.
ट्रेनच्या पुढच्या भागातही प्रवासी लटकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. खचाखच भरलेल्या ट्रेनच्या गेटवरही मोठ्या प्रमाणात लोक लटकले आहेत. केवळ हा जीवघेणाच नाही तर हा व्हिडिओ भारतीय रेल्वेवरही प्रश्न उपस्थित करत आहे. मात्र, व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, हा व्हिडिओ कुठचा आहे?

व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की ती दक्षिण २४  परगणा, सियालदह-मग्राहाट लोकल ट्रेन आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी ट्रेन भारतात धावणाऱ्या लोकल ट्रेनशी जुळते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया

एका व्यक्तीने लिहिले की, व्हिडिओ भारतातील आहे यावर विश्वास ठेवता येत नाही, तपासा तो ढाक्याचा असू शकतो. एकाने लिहिले की, म्हणूनच सरकार सर्व गाड्या 'वंदे भारत'मध्ये बदलत आहे. धरून ठेवण्यासारखे काहीच नसताना कुठे झुलणार? एकाने लिहिले की, ममता सरकारने केंद्र सरकारशी बोलून गाड्यांची संख्या वाढवावी. एकाने लिहिले की मंबईच्या लोकल बदनाम आहेत पण त्या मोटरमन समोर कधीच उभ्या राहत नाहीत.

अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी गृहमंत्री अमित शहा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि इतरांकडे यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकांचे म्हणणे आहे की जर अशीच परिस्थिती राहिली तर भारतीय गाड्यांची तुलना बांगलादेशशी होऊ लागेल. एवढेच नाही तर असा प्रवास करणे धोकादायक ठरू शकते.
मोटरमनसमोर उभे राहून प्रवास केल्यास सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत