BREAKING NEWS
latest

महिलांसाठी लोकल ट्रेनचे डबे वाढवण्याची उपविभागप्रमुख सोनू सुरवसे यांची खासदारांकडे मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.६ : अंबरनाथ ते सीएसटी दरम्यान जलद व धीम्या मार्गावरील उपनगरीय लोकल गाड्यांमधील महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये वाढ करण्याबाबत महिलांच्या वतीने शिवसेनेचे ठाकुर्लीतील उपविभागप्रमुख सोनू सुरवसे यांच्या तर्फे कल्याण लोकसभेचे संसदरत्न तसेच लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. 

डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ तसेच बदलापूर येथून मोठ्या संख्येच्या प्रमाणात महिला कर्मचारी वर्ग मुंबईला कामानिमित्त जातयेत असतो. सद्यस्थितीमध्ये मध्य रेल्वेच्या लोकलच्या डब्यांमध्ये महिलांसाठी असलेले राखीव डबे हे सध्या अपूरे पडत असून  त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी महिला कर्मचारी वर्ग यांना रेल्वेतून प्रवास करायला खूपचं त्रासदायक व अवघड असे होत आहे.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये महिलांसाठी राखीव असे खूपचं कमी डबे असल्याकारणाने त्यामध्ये चढताना व उतरताना महिलांना खूपचं त्रास तसेच यातना सहन कराव्या लागत आहे अशी महिलांची नाराजी असून आम्ही सर्वजण आपल्या मतदारसंघातील असून व आम्ही पहाटे ७ ते ९ यावेळेस मुंबईला कामाला जातयेत असल्याने मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर महिलांची प्रचंड गर्दी असल्याने काही महिलांना डब्यात चढताही येत नाही व त्यामुळे ते दरवाजावर कसेतरी लटकत उभे राहून प्रवास करतात. तसेच गाडी फास्ट झाल्यावर अपघात होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आम्हां सर्व महिलांसाठी मध्य रेल्वेच्या सर्व लोकल डब्यांमध्ये जास्तीत जास्त राखीव डबे ठेवण्याची आपणांस विनंती आहे असे महिलांचे म्हणणे असून दर एक तासाने गर्दीच्या वेळेमध्ये महिलांसाठी राखीव गाडी सोडण्यास विनंती आहे असे निवेदन ठाकुर्ली उपविभागप्रमुख सोनू सुरवसे यांच्या तर्फे कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांना देण्यात आले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत