डोंबिवली : डोंबिवलीच्या 'एकलव्य आर्ट फाऊंडेशन' कथक नृत्यसंस्थेची नऊ नृत्यरत्नांची नऊ रत्ने सोनेरी पंख घेऊन राजधानी नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक रॅलीमध्ये संगीत नाटक अकादमी प्रमुख संध्या ताई पुरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली पथ संचालन केले.
२६ जानेवारी रोजी राजधानी दिल्ली _कर्तव्यपथ_ प्रजासत्ताक दिन परेड मध्ये एकलव्य आर्ट फाऊंडेशन कथक नृत्य संस्थेतील आदरणीय नृत्यगुरू ऍड.सुनीला पोतदार यांच्या ९ कलाकारांची निवड संपूर्ण देशभरातील कलाकारांमधुन करण्यात आली होती. भारतभरातील ५०० हून अधिक नर्तकांच्या प्रतिष्ठित सहभागी कलाकारांमध्ये डोंबिवलीच्या 'एकलव्य आर्ट फाऊंडेशन' चे ९ कलाकार महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत कथ्थक नृत्य शैलीचे अभिमानाने प्रतिनिधित्व करताना पाहून प्रत्येक डोंबिवलीकरांची मान अभिमानाने उंचावली होती.
इएएफ समृद्धी चव्हाण यांनी '२०२३ रॅली'चा एक भाग बनून एकलव्यचा ध्वज फडकावल्या नंतर सलग दुसऱ्या वर्षी, अशा भव्य सोहळ्याचा भाग होण्याच्या एकलव्यच्या वचनबद्धतेचा हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण होता. 'एकलव्य आर्ट फाऊंडेशन' कथक नृत्यांगना अवनी पटवर्धन, सायली कोरडे, श्रृती चाळके, श्रेणी सुवारे, तनिष्का देशपांडे, रिया मोरे, मधुरा रामधरणे, कशीश केणे, ऋतुजा मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे 'एकलव्य आर्ट फाऊंडेशन'च्या संस्थापिका प्रख्यात नृत्यदिग्दर्शिका ऍड.सुनिला पोतदार या अशा अनेक गरुडझेपेचे श्रेय त्यांच्या गुरू आदरणीय संगीताचार्या वैशाली दुधे यांच्या सार्थ विश्वासाला देतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा