BREAKING NEWS
latest

‘रामायण’ चित्रपटाच्या शुटींगची जय्यत तयारी संभाव्य स्टारकास्ट ने सुरू..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि.४ : अयोध्येत काही दिवसांपूर्वीच श्रीराम मंदिर उद्घाटनाचा भव्य समारोह पार पडल्यामुळे आता देशभरातील वातावरण राममय झाले आहे. हजारो वर्षे भारतीयांच्या ह्रदयावर राज्य करणारी रामकथा मोठ्या पडद्यावर साकारण्याचे दिव्य अद्याप भारतीय चित्रपट सृष्टीत फारसे झालेले नाही. त्यातच आदिपुरुषच्या असमाधानकारक सादरीकरणानंतर रामायण विषयावर मोठ्या पडद्यावर चित्रपट साकारणे हे मोठे दिव्य ठरणार आहे. हे शिवधनुष्य आता दिग्दर्शक नितीश तिवारी उचलणार असल्याची माहिती समोर येत आहे. तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’या चित्रपटाची सध्या खुप चर्चा सुरु आहे. रामायण’ हा चित्रपट २०२५ च्या अखेरीस रिलीज करण्याची निर्मात्यांचा प्लॅन आहे.

या चित्रपटात कोण काम करणार याबाबत काही संभाव्य कलाकारांची नावे समोर आली आहेत. मात्र चित्रपट निर्मात्यांनी याविषयीची अधिकृत घोषणा अजून केलेली नाही परंतु येत्या काही दिवसात याची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान ‘रामायण’ संदर्भात ताजी माहिती अशी की, नितेश तिवारी शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. साई पल्लवी सीतेची तर ‘केजीएफ’ फेम यश रावणाची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जात आहे. ‘रामायण’चे शूटिंग मार्च महिन्यापासून मुंबई आणि लंडनमध्ये होणार असल्याचं सांगितलं जात आहे. रणबीर कपूर मुंबईत ६० दिवसाचं शूटिंग करणार आहे. यानंतर निर्माते लंडनला जातील जिथे लंकेच्या भागाचे शूटिंग केले जाईल. तेथे देखील ६० दिवसात चित्रिकरण पूर्ण केले जाईल.

मिडिया रिपोर्टनुसार, चित्रिकरण्याआधी रणबीर कपूरने दारू आणि मांसाहार वर्ज्य केलाय. रणबीर लेट नाईट पार्ट्यांनाही जात नसल्याचं म्हटलं जात आहे. प्रभू रामाचे हे पात्र साकारण्यासाठी त्याने हे केले आहे जेणेकरून तो त्या पात्राशी आध्यात्मिकरित्या जोडला जाईल. हाती आलेल्या माहितीनुसार,सनी देओल ‘रामायण’मध्ये हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचे जवळपास निश्चित झालंय. सनीसह लारा दत्ताला कैकेयीची भूमिका ऑफर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विभीषणच्या भूमिकेसाठी विजय सेतुपती यांच्याशी बोलणी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर बॉबी देओल कुंभकर्णाची भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत