डोंबिवली : शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवणारे म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले दांपत्य. फुले दाम्पत्याला आदर्श मानून लहान मुले शिक्षणापासुन वंचित राहू नये, याकरिता अहोरात्र शिक्षणाचा प्रसार करणारे डोंबिवलीतील 'निहाल फाऊंडेशन' (महाराष्ट्र राज्य रजी.) प्री प्रायमरी स्कूल यांचे दुसरे वार्षिक स्नेह संमेलन व महिलांकरिता हळदी कुंकू सभारंभ शनिवार दि.३ फेब्रुवारी रोजी सायं ४ वाजता 'निहाल प्रि प्रायमरी स्कूल', हनुमान मंदिर जवळ, कोळेगाव घेसर रोड, डोंबिवली पूर्व येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
'निहाल फाऊंडेशन' महाराष्ट्र राज्य (रजिस्टर) अंतर्गत निहाल प्रि प्रायमरी स्कूल, आरटीई २५% अंतर्गत मोफत शालेय प्रवेश, निहाल बालविकास सेवा प्रकल्प, निहाल बेरोजगार सेवा, सामाजिक क्षेत्रात अन्य क्षेत्रात गेले ३ वर्षा पासून कार्यरत आहे. १५० पेक्षा जास्त मुलांना मोफत शालेय प्रवेश, १०० पेक्षा जास्त बेरोजगार यांना नोकरी, अन्य मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शाळात प्रवेश कमीत कमी फी मध्ये चांगल्या प्रकारे मुलांना शाळेतील प्रवेश स्वतः शाळा उपलब्ध करून दिलेली आहे.
उपस्थित निहाल प्रि प्रायमरी स्कूल संस्थपिका अध्यक्षा मा.वर्षा विलास काकडे, रिपब्लिकन सेना महिला अध्यक्षा सुनीता संजय डोळस, रिपब्लिकन सेना महिला मुंबई सचिव सदाफुलें ताई, चेंबूर तालुका अध्यक्ष श्रीकांत साळवे ऍण्ड रिपब्लिकन सेना महिला पदाधिकारी, स्थानिक वरिष्ठ नागरिक रहिवाशी म्हात्रे बाबा पोलीस निरीक्षक विजय पाटील, वंचित बहुजन आघाडी महिला डोंबिवली ठाणे शहर अध्यक्ष अस्मिता सरवदे आणि रिपब्लिकन सेना मुंबई संघटक, निहाल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य (रजिस्टर) मॅनेजिंग डायरेक्टर निहाल बेरोजगार व निहाल बालविकास सेवा अध्यक्ष विलास काकडे व बाल विद्यार्थी पालक व महीला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा