डोंबिवली दि.१५ : महायुती सरकारकडून डबल इंजिनचे सरकार आहे असे वारंवार सांगितले जाते. परंतु डबल इंजिन सरकार याचा अर्थ लोकांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असं वाटत असेल तर प्रत्यक्षात तसं नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हीच दोघं डबल इंजिन आहेत असे परखड मत राजकीय विश्लेषक, समीक्षक, ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक भाऊ तोरसेकर यांनी डोंबिवलीत ब्राम्हण सभा येथे झालेल्या त्यांच्या 'फक्त मोदीच' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी व्यक्त केले.
'मोरया प्रकाशन' आणि 'ब्राह्मण सभा ग्रंथालय समिती' यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊ तोरसेकर यांचे 'फक्त मोदीच' या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ ब्राह्मणसभा डोंबिवली येथे संपन्न झाला त्यावेळी त्यांनी आपले मत स्पष्ट केले. यावेळी राज्याचे कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण, बालरोगतज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर, सुचेता पिंगळे, गौरी दिव, योगिनी आठल्ये, विद्या घैसास, माजी उपमहापौर राहुल दामले, माजी नगरसेवक संदीप पुराणिक, प्रज्ञेश प्रभुघाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान भाऊ तोरसेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध लढायला कोणी तयार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक खूप सोपी झाली आहे. नरेंद्र मोदी हे २०४७ च्या निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. इतर पक्ष २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीकडे पाहत आहेत. त्या परिस्थितीत नरेंद्र मोदी हे २५ वर्षं पुढचा अभ्यास करतात. ही निवडणूक नरेंद्र मोदीच जिंकणार. त्यांनी पुढे सांगितले की, राजकारणात दूरगामी धोरण असले पाहिजे. गिरणी कामगारांसाठी दत्ता सामंत यांनी आंदोलन केले. पण आता गिरणी नाही, गिरणी कामगार नाही आणि कामगार नेतेही उरलेले नाहीत. त्यामुळे राजकारणात दूरगामी धोरण असणे गरजेचे आहे.
'फक्त मोदीच' या पुस्तकाचे प्रकाशन
लोकसभा निवडणूक निकालाचे असे अंदाज सांगताना हे आकडे कुठून येतात वा कशामुळे येतात, याबद्दल चर्चा करणारे आणि त्यामागचा कार्यकारणभाव उलगडून दाखवणारे हे पुस्तक आहे. 'फक्त मोदीच' हे पुस्तस्क लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने मागील दहा वर्षांतील भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेले तिसरे पुस्तक आहे. हे पुस्तक येणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालाचा अचूक आकडा सांगण्याबरोबरच असे आकडे कुठून येतात वा कशामुळे येतात, ते समजावण्यासाठीचे आहे असेही या पुस्तकातून सांगण्यात येते. हे पुस्तक आकडा सांगण्यापेक्षा असे आकडे कुठून येतात, वा कशामुळे येतात, ते समजावण्यासाठीचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा