BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेत शिन जापनीज शिक्षणाचा आविष्कार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.१४ : मातृभाषा आणि इंग्रजी भाषा ह्या पेक्षाही वेगळी भाषा अवगत होणे म्हणजे एक प्रकारचे मिळालेले अधिकतर ज्ञान आणि नवीन भाषेविषयी वाटणारे कुतूहलचं म्हणावे लागेल. अशाच एका आगळ्या वेगळ्या जापनीज भाषेचा आविष्कार 'जे एम एफ' शिक्षण संस्थेत साकारला गेला. गेल्या दोन तीन वर्षापासून शिशु विहार ते इयत्ता दुसरी पर्यंत 'शिन जापनीज कलाकृती' मुलांना शिकवण्यात येत आहे. सर्वच छोटी मुले उत्साहाने आणि कुतूहलाने ही 'शिन जापनीज' भाषा आणि त्यामधील कलाकृती ला प्रोत्साहित होऊन शिकत आहे.
शिन शॅन (सिन चॅन) हा छोट्या मुलांचा मित्र. रोजच हा जापनीज मित्र त्यांच्या भेटीला येतो आणि त्याला पाहून, ऐकून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. अशीच एक जापनीज कलाकृती 'जन गण मन' शाळेत असावी ही कल्पना अस्तित्वात आणली ते म्हणजे अध्यक्ष  डॉ. राजकुमार कोल्हे आणि शाळेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी. जपान येथून जापनीज भाषेचे प्रशिक्षक श्रीयुत टकेहिरो नाकामोरा ह्यांनी भारतात येऊन  'जे एम एफ' संस्थेमधे सर्व विद्यार्थ्यांना जापनीज भाषेचे प्रशिक्षण दिले व अजूनही देणे चालू आहे. त्याच बरोबर प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मानसी शिंगटे, प्रियांका म्हस्के, सुरभी सुरेश, वर्षा पवार, संध्यारानी नागराजन, ललिता नारायण, रती वैद्य ह्या देखील मुलांना प्रशिक्षण देत आहेत.
दिनांक १४ मार्च रोजी शाळेच्या मधुबन वातानुकुलीत दालनात शिन प्रोग्राम ची स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली. ज्यामधे पुस्तकात दाखवल्या प्रमाणे दहा सेकंदाच्या स्वतःच्या आकलन शक्तीने ठोकळे जोडून वेळेत पूर्ण करणे हे उद्दिष्ट होते. सर्वच मुलांनी स्वतःच्या कल्पना शक्तीने आणि प्रयत्नांनी ते कार्य पूर्ण केले. त्यानंतर दुसरी पातळी, तिसरी पातळी अशा प्रकारे एकेक पातळी वाढत जाऊन हसत खेळत शिक्षण व स्पर्धा परीक्षा सफल झाली. 'जन गण मन' इंग्लिश सेकंडरी शाळेचे आराध्या राऊत व विहान गांधी इयत्ता पहिली तर चैतन्य सुर्वे इयत्ता दुसरी मधील ह्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर 'जन गण मन विद्यामंदिर' चे श्रावणी पवार, मयुरेश्वर मैत्री (इयत्ता पहिली) तसेच अवनी साबे, श्रेयांश देसाई, वरद साळसकर इयत्ता दुसरी मधील ह्या विद्यार्थ्यांनी व शिशु विहार मधील मुलांनी देखील प्रथम क्रमांक पटकावला.
इतर विषयांच्या अभ्यासाबरोबरच हसत खेळत इतर भाषेचा अभ्यास शिकण्याचा ध्यास असावा, लहान वयातच तल्लख बुद्धी, स्मरणशक्ती वाढत जाते असे सांगून डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्व मुलांचे कौतुक केले. यशस्वी झालेल्या मुलांचा गौरव  पदक देऊन तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देऊन डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत