BREAKING NEWS
latest

चिमुकलीचे पाळणाघरात हाल करणाऱ्या तिघांवर डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२०: नोकरीनिमित्त आई-वडील कामावर जात असल्याने मुलीला पाळणाघरात ठेवले असता तिचे हाल करणाऱ्या पाळणाघरातील तिघांवर रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'हॅप्पी किड्स केअर' मध्ये हा प्रकार घडला असून याबाबत पाळणाघरातील चिमुकलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राधा नाखरे, गणेश प्रभुणे आणि आरती प्रभुणे असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांवर भादंवि कलम अन्वये ३२४,३४ अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आल आहे. फिर्यादी मंदार ओगले हे ३ वर्षाच्या मुलीस डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडवरील प्रभुणे यांच्या 'हॅप्पी किड्स केअर' पाळणाघरात सकाळी आठ ते सायंकाळी आठवाजेपर्यत ठेवत होते. या पाळणाघरात राधा नाखरे ही नोकरी करते. आपल्या मुलीचे पाळणाघरात हाल होत असल्याचे समजल्यावर ओगले दाम्पत्याने याबाबत सखोल चौकशी केली असता आपल्या मुलीला १ मार्च २०२४ पासून मुलीला मानसिक त्रास देवून मारहाण करत असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी पोलीसांत जाऊन तशी फिर्याद दिली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत