दिल्ली दि.२१ : लोकसभा निवडणुकीचा आखाडा तापण्याआधीच दिल्लीच्या राजकारणाला हादरंवून सोडणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर 'ईडी'ने अटक केली आहे. दोन तासांच्या चौकशीनंतर 'ईडी'ने केजरीवालांना अटक केली आहे. आतापर्यंत त्यांना १० समन्स बजावण्यात आले होते, पण त्यांनी त्याला दाद दिली नाही. अखेरीस केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.
दारू घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'ने अरविंद केजरीवाल यांना आज दहावा समन्स बजावला होता. 'ईडी'चे सहा ते सात अधिकारी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले होते. त्यांनी केजरीवाल यांना समन्स जारी केलं होतं. आतापर्यंत दारूच्या घोटाळ्या प्रकारांनी 'ईडी' कडून ८ समन्स बजावण्यात आले होते. पण केजरीवाल यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेरीस 'ईडी'ने केजरीवाल यांना अटक केली आहे. दरम्यान, केजरीवाल यांना अटक होऊ नये म्हणून तातडीने आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात येवू नये अशी मागणी याचिकेत सुप्रीम कोर्टात करण्यात येणार आहे. या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी यासाठी आम आदमी पार्टीकडून प्रयत्न सुरू आहे.
अरविंद केजरीवालांवर आरोप
१. गुन्ह्याच्या प्रक्रियेदरम्यान आम आदमी पार्टीला ३३८ कोटी रुपये पोहोचल्याचं 'ईडी'च्या तपासात समोर आले आहे. मुळात, मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयासमोर ३३८ कोटी रुपयांचा मनी ट्रेल ठेवला होता, ज्यामध्ये हे सिद्ध झाले होते की उत्पादन शुल्क धोरणादरम्यान ३३८ कोटी रुपये होते. दारू माफियांतून आम आदमी पक्षापर्यंत पोहोचले. अरविंद केजरीवाल हे पक्षाचे मुख्य नेते आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे.
२. अबकारी घोटाळ्यातील आरोपी इंडोस्पिरिटचे संचालक समीर महेंद्रू यांनी चौकशीदरम्यान 'ईडी'ला सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत जवळच्या विजय नायरने 'फेस टाईम' ऍप द्वारे अरविंद केजरीवाल यांना भेटायला लावले होते. ज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी त्यांना विजय नायर हा त्यांचा माणूस असल्याचे सांगितले. आणि त्याने नायरवर विश्वास ठेवायला हवा.
३. अरविंद केजरीवाल यांच्या घरी नवीन उत्पादन शुल्क धोरणाबाबत बैठकही झाली.
४. मनीष सिसोदिया यांचे तत्कालीन सचिव सी अरविंद यांनी चौकशीदरम्यान सांगितले की अबकारी धोरणात ६% इतका मार्जिन नफा होता जो अरविंद केजरीवाल यांच्या मान्यतेने १२% पर्यंत वाढवला गेला. याचा अर्थ अरविंद केजरीवाल यांचीही भूमिका होती.
५. नवीन उत्पादन शुल्क धोरणाबाबत जी मंत्रिमंडळाची बैठक झाली ती मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. 'ईडी' या पाच मुद्यांच्या आधारे केजरीवाल यांची चौकशी करू इच्छित होती.
दिल्लीचा नवे मुख्यमंत्री कोण ?
अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता आहे. जर केजरीवाल यांना अटक झाली तर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल, दिल्लीचे अर्थमंत्री आतिशी मार्लेना, गोपाल राय आणि कैलाश गेहलोत यांची नावे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. मात्र, या सर्व नावांशिवाय आणखी काही नावांवरही संसदीय समिती निर्णय घेऊ शकते असे बोलले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा