BREAKING NEWS
latest

लोकसभा निवडणुक आचारसंहिताच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली शहरात पोलीसांचा 'रूट मार्च'..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२१ : आज दि. २१.०३.२०२४  रोजी सकाळी १०:३०  ते ११.४५ वाजेचे दरम्यान आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, गुड फ्रायडे, ईस्टर संडे, रमजान ईद च्या अनुषंगाने मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग व मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुचना प्रमाणे ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 'रूट मार्च'चे आयोजन करण्यात आले.
                       
सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे, मानपाडा पोलीस ठाणे, टिळकनगर पोलीस ठाणे, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सोबत पोलीस कर्मचारी, अंमलदार, सीआयएसएफ, एसआरपीएफ यांनी 'रूट मार्च' ची सुरुवात  टिळक नगर पोलीस स्टेशन हद्दीतून डोंबिवली जिमखाना मैदान येथून सुरु होऊन कल्याण रोड ने शेलार चौक मार्गे टिळक चौकातून पुढे डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीमधील टिळक रोड मार्गे सर्वेश हॉल, महानगरपालिका इंदिरा गांधी चौक, टंडन रोड, कोपरगाव ब्रिज मार्गे विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीमधील स्टेशन परिसरातून सम्राट चौक, गोपी टॉकीज, गुप्ते रोड मच्छी मार्केट, डोंबिवली रेल्वे स्टेशन चे बाजूने पुढे बावन चाळ डोंबिवली पश्चिम या ठिकाणी रूट मार्च  समाप्त करण्यात आला.
'रूट मार्च' च्या ताफ्यामध्ये सहभागी सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, अधिकारी व अंमलदार तसेच वपोनि. विजयकुमार कदम टिळकनगर पोलीस स्टेशन, वपोनि. विजय कादबाने मानपाडा पोलीस स्टेशन, वपोनि. गणेश जावदवाड डोंबिवली पोलीस स्टेशन, वपोनि. संजय पवार विष्णुनगर पोलीस स्टेशन. तसेच डोंबिवली विभागाचे, टिळक नगर, मानपाडा, डोंबिवली, विष्णूनगर पोलीस स्टेशन चे १४ अधिकारी, ७५ अंमलदार, सीआयएसएफ ०१ पोलीस निरीक्षक ०२ पोलीस अधिकारी, ६० अंमलदार, एसआरपीएफ प्लॅटून, १ अधिकारी, १० अंमलदार तसेच रूट मार्च मधील सहभागी वाहने - एबल डोंबिवली  मोबाईल, ०४ पीटर मोबाईल, ०४ सीआरएम  मोबाइल, ०४ पीसीआर टू मोबाईल, सीआयएसएफ ०२, मोबाईल एसआरपीएफ ०१ मोबाइल ही वाहने सुद्धा 'रूट मार्च' च्या ताफ्यामध्ये सहभागी होती.शहर वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने व त्यांच्या अंमलदारांनी या 'रूट मार्च' दरम्यान वाहतुकीचे उत्तम नियोजन केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत