BREAKING NEWS
latest

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील निवडणुका होणार मतपत्रिका वर ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशा नुसार कल्याणमध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली या बैठकीत कल्याण व भिवंडी लोकसभा निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत एक मताने ठराव करण्यात आला की, मराठा मोर्चा  या दोन मतदार संघात मोठ्या प्रमाणात उमेदवार येथे उतरवणार असल्याने कल्याण व भिवंडी लोकसभा मतदार संघात निवडणुका मतपतत्रिकेवर होतील अशी शक्यता दिसून येत आहे. कारण जास्त उमेदवार झाल्यास निवडणुका  मतपत्रिकेवर घ्याव्या  लागतील. देशात "ईव्हीएम हटाव" ची मोहीम सुरू असताना आता या लोकसभा निवडणुका अनेक मतदार संघात मतपत्रिकेवर घ्याव्या लागतील असे एकंदर चित्र मराठा मोर्चा च्या भूमिके मुळे दिसून येत आहे. 

निवडणूक आयोग एका लोकसभा मतदार संघात ५६  पर्यत उमेदवार ईव्हीएम द्वारे लढण्या साठी तयारी करू शकतो. पण असे सांगितले जात आहे की निवडणूक आयोग २०० उमेदवार कसे ईव्हीएम मधे येवू शकतील या साठी प्रयत्नशील आहे. या मुळे मराठा समाज या कल्याण व भिवंडी लोकसभा मतदार संघात प्रत्येकी २०० पेक्षा जास्त ४०० पर्यत उमेदवार उभे करण्याची तयारी करील असे या बैठकीत ठरविण्यात आले.

मराठा मोर्चा मोठ्या संख्येने उमेदवार उतरवणार

मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे समाजाच्या वतीने समाज बांधवाना कल्याण व भिवंडी या दोन्ही लोकसभा मतदार संघात मोठ्या संख्येने उमेदवार म्हणून उभे करण्याचे समाजाच्या वतीने ठरले आहे. त्याचं प्रमाणे झालेल्या बैठकीत त्यासंदर्भात एकमताने ठराव करण्यात आले. या बरोबरच मराठा समाजाने दलीत, मुस्लिम व इतर समाज जे मराठा समजा बरोबर आहेत त्यांनी देखील आपले उमेदवार उतरवावे असे अहवान या समाजाला करण्यात येणार असल्याचे या वेळी बैठकीत ठरविण्यात आले. सदर बैठकीत दोन्ही लोकसभा मतदार संघातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत साठी धनंजय जोगदंड, सोमनाथ सावंत, रवी कदम, शाम आवारे, शुभाष गायकवाड, बबन जरांगे यांच्या सह १०० मराठा समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत