अहमदनगर : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. कारण पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके अशी लढत होणार असल्याचं चित्र दिसत आहे.
आमदार निलेश लंके यांची ओळख अजित पवारांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून आहे. दक्षिण अहमदनगरमधून ते लोकसभेसाठी इच्छुक होते. पण अजित पवार गटाला तीन ते चार जागा मिळण्याच्या चर्चेमुळे त्यांची चांगलीच अडचण झाली होती. त्यामुळे त्यांनी आता शरद पवारांची साथ दिल्यानंतर ते लोकसभेचे उमेदवार असतील अशा चर्चा रंगल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा