BREAKING NEWS
latest

मराठे लोकसभेच्या रिंगणात ! नगर दक्षिण लोकसभेसाठी ६०० मराठा उमेदवार उभे करणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

अहमदनगर : सकल मराठा समाजाच्या वतीने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात लोकसभेसाठी सातशे ते आठशे मराठा उमेदवार अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मराठा समन्वयक राम जरांगे यांनी दिली आहे. त्या संदर्भात तयारी सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. तर आत्तापर्यंत पाचशे जणांची तयारी झाल्याचं बोललं जात आहे. आतापर्यंत सर्वाधिकार जामखेड येथे १०४ जणांनी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. तर श्रीगोंदा ३८, कर्जत १२, नगर तालुका ५४, नगर शहर ५५, पाथर्डी ४८, पारनेर २९ जणांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे स्वतः डिपॉझिट भरून हे उमेदवार उभे राहणार असल्याचे राम जरांगे यांनी सांगितलं आहे.

तसेच, प्रत्येक गावातून जास्तीत जास्त ४ तर कमीत कमी २ मराठा उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रशासनासमोर मोठे डोकेदुखी ठरणार आहे, यातून काय मार्ग काढला जातो है पाहणं महत्वाच असणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील समर्थक हे आक्रमक झाले असून सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी आता लोकसभा निवडणुकीत देखील दंड थोपटल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत