BREAKING NEWS
latest

जोगेश्वरीत इमारतीचे बांधकाम सुरु असताना एक लोखंडी रॉड पडून युवक जखमी!


संदिप कसालकर

इमारतीचे बांधकाम सुरु असताना एका युवकावर रॉड पडून त्याला दुखापत झाल्याची घटना जोगेश्वरी पूर्वेतील दुर्गा नगर परिसरात घडली आहे. मुंबईतील जोगेश्वरी पूर्वे येथील दुर्गा नगर परिसरात एक विकासकाम सुरु आहे. दिनांक १४ मार्च रोजी सकाळच्या वेळी एक लोखंडी रॉड एका युवकाच्या हातावर पडला. या मध्ये त्या युवकाला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 


अश्याच प्रकारची घटना काही महिन्यांपूर्वी जोगेश्वरी पूर्व स्टेशन रोड परिसरात घडली होती. एक मोठा लोखंडी रॉड पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. दुर्गा नगर परिसरात सुरु असलेल्या या विकासकामात निकृष्ट दर्जाची सुरक्षा जाळी लावण्यात आली असल्यामुळे हि घटना घडली असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. 


या परिसरातून असंख्य लहान मुलेही शाळेत जात असतात. त्यामुळे निश्चितच या परिसरातून जाणाऱ्या अगदी प्रत्येकाच्या जीवाला धोका असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या या घटनांना आळा कधी बसणार असा प्रश्न सध्या सदर घटना पाहून उपस्थित राहत आहे. 


संबंधित प्रशासनानं हि घटना गांभीर्याने घेऊन यावर तात्काळ कारवाई करावी असे येथील काही दक्ष नागरिकांचे म्हणणे आहे.

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत