BREAKING NEWS
latest

शिवजयंती निमित्त डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भव्य मिरवणूक सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२८ : शिवसेना शिंदे गट मध्यवर्ती कार्यालयातून शिवजयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने डोंबिवलीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. डोंबिवली पूर्वेकडील शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेजवळील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यास अभिवादन करत पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीला सुरुवात झाली. लेझीम व ढोल-ताशाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे, तालुकाप्रमुख महेश पाटील, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, संजय पावशे,  उपजिल्हा प्रमुख रवी पाटील, नितीन पाटील, शरद गंभीरराव, जितेन पाटील, अमोल पाटील, गजानन व्यापारी, संतोष चव्हाण, सागर बापट, सागर जेधे, प्रकाश माने, अर्जुन पाटील, गजानन पाटील, योगेश म्हात्रे, नकुल गायकर, रवी म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, सोनू सुरवशे, महिला आघाडीच्या केतकी पोवार, कल्पना पाटील, अस्मिता खानविलकर, महिला उपशहर संघटक प्रतीक्षा माने, माजी नगरसेविका दीपाली पाटील, पूजा म्हात्रे, कविता म्हात्रे, रुपाली म्हात्रे, अपर्णा पावशे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.
डोंबिवली मध्यवर्ती शाखेतून निघालेल्या शिवजयंती च्या या मिरवणुकीत लहान मुलांनी लाठी काठी, दांडपट्टा, तलवारबाजी ची प्रात्यक्षिके सादर केली ती पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. मिरवणुकीत दोन पांढरे अश्व तुतारी, ढोल ताशांच्या तालावर नाचवले गेले. शिवजयंती निमित्त डोंबिवली शहरात ठीक ठिकाणी शिवप्रतिमेचे पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांचे देखावे तसेच चलचित्र प्रदर्शित करण्यात आले होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत