BREAKING NEWS
latest

फलाट गर्दीमुक्त होणार; कल्याण डोंबिवली स्थानकात रेल्वेचा महत्वाचा निर्णय..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिबली: मुंबईकरांच्या लाईफलाईन म्हणजे लोकल. कामाच्या व शिक्षणासाठी मुंबई शहरात येण्यासाठी वसई-विरार असो किंवा कल्याण- डोंबिवलीकरांचे एकमेव साधन म्हणजे लोकल. लोकलला सातही आठवडे व बाराही महिने गर्दी असते. लोकांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने अनेक उपाययोजना आखल्या आहेत. गाड्यांची संख्या वाढवणे, फेऱ्या वाढवणे असो किंवा एसी लोकल मात्र तरीही लोकलची गर्दी काही तसूभरही कमी झालेली नाही. याउलट गर्दी वाढतेच आहे. 

नागरिकांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी रेल्वे सतत काहीना काही निर्णय घेत असते. आताही रेल्वे प्रशासनाने रेल्वे फलाट गर्दीमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने रेल्वे कामदेखील करत आहे. रेल्वे फलाट गर्दीमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वेने कुर्ला, कल्याण, डोंबिवली, वडाळा यासारख्या काही स्थानकातील खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला आता मंजुरी मिळाली असल्याने खाद्यपदार्थ स्टॉल हटवण्यात येणार आहेत. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका वृत्तपत्राला यासंबंधात माहिती दिली होती. रेल्वे फलाट गर्दी मुक्त करण्याचे एक प्रमुख उद्दिष्ट म्हणजे, गाडी फलाटावर आल्यानंतर सीट मिळवण्यासाठी नागरिक लोकलमध्ये चढण्यासाठी घाई करतात. अशावेळी कधी कधी चेंगराचेंगरीची घटना घडतात. किंवा लांब पल्ल्यांच्या गाड्या आल्यानंतर अधिक गर्दी वाढते. त्यावर रेल्वेने हा तोडगा काढला आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत