डोंबिवली दि.२६ : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली (पूर्व) ह्या ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य अश्या सेवाभावी संस्थेनी राष्ट्रभावना जागृती हे उद्दिष्ट बाळगून मंगळवार दिनांक २६ मार्च रोजी रोटरी सदस्य, कुटुंबीय आणि डोंबिवलीकर ह्या सर्वांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या चित्रपटाचा विशेष खेळ हा 'मिराज चित्रपटगृह' डोंबिवली इथे रात्री ८ वाजता आयोजित केला होता. १२५ पेक्षा जास्ती लोकांची ह्या विशेष खेळाला उपस्थिती लाभली होती.
हा विशेष खेळ आयोजित करण्यासाठी क्लब चे माजी अध्यक्ष रोटेरिअन कौस्तुभ कशेळकर ह्यांनी विशेष प्रयत्न केले. ह्या विशेष खेळाला 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इस्ट' चे विद्यमान अध्यक्ष श्री. रघुनाथ लोटे, माजी जिल्हा प्रांतपाल डॉ. उल्हास कोल्हटकर, रोटरी विकास ट्रस्ट चे माधव चिकोडी, राजन सावरे, अथर्व जोशी, अरुण अष्टीकर, संजय जोशी, सतीश अटकेकर, विनायक आगटे, संतोष प्रभुदेसाई, संतोष भणगे, डॉ. विनय भोळे, अजित गांधी, दिलीप काटेकर, श्रीकांत जोशी आणि इतर अनेक सदस्य उपस्थित होते. 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट' तर्फे समाजातील सर्व लोकांसाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जातात आणि अश्याच प्रकारे उत्तमोत्तम दर्जेदार चित्रपटांचे विशेष खेळ हे सुद्धा सर्वांसाठी आयोजित करण्यात येतात अशी माहिती रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इस्ट चे जनसंपर्क अधिकारी रोटेरिअन मानस पिंगळे ह्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा