BREAKING NEWS
latest

कोकण रेल्वेत नियोजनाचा अभाव व समन्वय नसल्यानेच कोकण रेल्वेवर ६ हजार कोटींच्या कर्जाचा बोजा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : शिमगा व गणपती उत्सव  हे कोकणातील सर्वात दोन मोठे सण, याला मुंबईतून कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हात आपल्या गावी लाखो चाकरमनी जातात, दरवर्षाची गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेवरील प्रवासी संघटना या उत्सवा अगोदरच महीना दोन महीना कोकण रेल्वे मार्गावर जादा हॉलिडे स्पेशल रेल्वेची मागण्या करतात. यावर्षी होळी रविवार दि.२४ मार्च तर सोमवार दि.२५ मार्चला धुलिवंदन अशा शनिवार, रविवार व सोमवार सलग तीन सुट्या आल्याने शुक्रवार व शनिवारी रात्री कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांची गर्दी लक्षात घेता या दिवशी जास्त रेल्वेची संख्या असायला हवी होती मात्र कोकण रेल्वे प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी हे उत्तरप्रदेश बिहारचे असल्याने त्यांचा आणि कोकणातील सणांचा दूर दूरचा संबंध नाही, शिवाय ते मागणी करणाऱ्या प्रवासी संघटना किंवा कोकण रेल्वे सल्लागार समिती यांच्याशी समन्वय साधून जादा रेल्वेचे नियोजन करत नसल्याने ऐन गर्दीच्या दिवशी ट्रेनच उपलब्ध होत नाहीत, हा मागील अनेक वर्षाचा इतिहास आहे.

कोकणातील शिमगोत्सव हा साधारण होळीच्या पुर्वी आठवडाभर सुरू होऊन तो गुढीपाडव्या पर्यंत चालतो, मात्र याची कोकण रेल्वे प्रशासनाला माहीती नसल्याने ते चुकीच्या पद्धतीने रेल्वेचे नियोजन करतात.व शिमग्यानंतर साधारण जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत चाकरमन्यांची कोकणात मोठी वर्दळ असते, मात्र मागणी करूनही रेल्वेचे तसे नियोजन दिसंत नाही. कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी संख्या खूप मोठी आहे मात्र त्याला मागणी करूनही पुरक रेल्वे मिळत नाहीत परिणामी चाकरमन्यांना जनरलच्या बोगी फुल झाल्याने स्लीपर  कोचचा आधार घेऊन साध्या तिकीटावर प्रवास करावा लागतो, मात्र तिकीट तपासनीस अशा प्रवाशांकडून दंड वसूल करतात, हे चुकीचे आहे. प्रवाशांना आवश्यकता असतानाही रेल्वे चा आरक्षण कोटा फुल झाल्यास चाकरमन्यांनी प्रवास करायचा तरी कसा ? मागणी करूनही रेल्वेचा पुरवठा का केला जात नाही ? आम्ही कोकण रेल्वेला बिझनेस देतोय पण रेल्वे ते नाकारतेय, हे खेदाचे आहे. आणि असे दरवर्षी होळी व गणपतीला होते, कोकण रेल्वेच्या चुकीच्या नियोजन धोरणामुळेच त्यावर ६ हजार कोटींच्या कर्जाचा बोजा आहे.
 -- श्री.यशवंत जडयार (सेक्रेटरी : अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, मुंबई)
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत