डोंबिवली : निळजे, लोढाहेवन जवळील पलावा शहरात एकता प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती महोत्सव कासा-रिओ, पलावा येथिल गणेश मंदिर येथे गुरुवार दिनांक २८ मार्च, २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या नियोजना प्रसंगी सकाळी ठीक १० वाजता श्री.छत्रपती शिवराय यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. त्यानंतर काही सामाजिक बांधिलकीतून विविध कार्यक्रम होतील तसेच कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून चित्रकला स्पर्धेचे देखील यावेळी आयोजन करण्यात आले आहे. शिवाय सायंकाळी ६.०० ते ९.०० या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिजाऊचा पुत्र शोभे ।
शूर शिवाजी राजा ।।
पराक्रमी शिवबा सारखा ।
ना जगात या दुजा ।।
रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिसरातील शिवप्रेमीनी आयोजित कार्यक्रमात सर्वानी आपला सहभाग अवश्य नोंदवावा आणि शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हावे असे आवाहन परिसरातील नागरिकांना एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर कोंडाळकर यांनी केले आहे.
चित्रकला स्पर्धा : वेळ दुपारी ३ ते ४.३० पर्यंत असेल
गट पहिला - ५ ते १४ वर्षे
चित्रकलेतील विषय खालील प्रमाणे असतील.
१) महाराष्ट्रातील गड किल्ले
२) निसर्गचित्र
३) मुक्तहस्त चित्र
खुला गट वय वर्ष १५ पासून पुढे
दुपारी २ ते ३ पर्यंत
विषय खालील प्रमाणे असतील.
१) शिवचरित्रातील प्रसंग
निबंध सपर्धा ५ ते १४ वर्षे
२) मी किल्ला बोलतोय (शिवकालीन)
३) महाराजांचे मावळे, मंत्री, योद्धे, सहकारी.
निबंध सपर्धा १४ पासून पुढे खुला गट
१) आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर..
२) छत्रपती शिवाजी महाराज एक प्रेरणा स्तोत्र
परिसरातील कुणाला शिवरायांचा पोवाडा, गाणी, शिवाजी महाराजांबद्दल कथाकथन, वकृत्व, वेशभूषा सादर करावयाच्या असल्यास तसेच सांघिक नृत्य (ग्रुप डान्स) किंवा एकल नृत्य (सोलो डान्स) सादर करायचा असेलयास त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. नृत्य सादरीकरण ३ ते ५ मिनिटांपेक्षा जास्त असू नये याची सहभागी होणाऱ्यांनी नोंद घ्यावी. तसेच सांघिक नृत्य २ ते १० जणांमध्ये बसवावे. गाणी निवडताना त्या दिवसाला साजेशी अशी निवडावी.
अधिक माहितीसाठी संपर्क :
मनीषा पाटील - ९९८७०७९१३३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा