BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील नववर्षं स्वागतयात्रेत कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांच्यासह मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०९ : डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान तर्फे गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्षं स्वागत यात्रेची प्रथा १९९८ पासून सुरू करण्यात आली. यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांची पत्नीसह विशेष उपस्थिती होती. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या शोभा यात्रेत सहभागी झाले होते.
यंदाचे गुढीपाडवा निमित्त काढलेल्या ह्या नववर्ष स्वागत यात्रेचे २६ वे वर्ष असून यंदा डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराला १०० वर्ष पुर्ण झाली आहेत. यंदाच्या नववर्षाच्या शोभायात्रेत मराठी कलाकारांनी हजेरी लावून डोंबिवलीतील नागरिकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी म्हटले की, मी खात्री बाळगतो की असुरांना देखील सूर काढण्याची ताकत माझ्यात निर्माण होवो या गुढी पाडव्याच्या निमित्ताने नवीन संकल्प मी करतो आणि निश्चितपणे लोकशाही मध्ये बसणारा असा एक पवित्र हक्क प्रत्येक नागरीलकाला आहे म्हणून आपल्याला सुट्टी मिळेल म्हणून त्यादिवशी मतदानाला आपण जायचं नाही असं करू नका तर मतदानाचा हक्क बजावा, लोकशाही सुदृढ व निरोगी असण्याकरता आपला अधिकार आपण वापरला पाहिजे असे आवाहन त्यांनी नववर्ष शोभा यात्रेत डोंबिवलीकरांना व उपस्थित तरुणाईला केले.
डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे (भागशाळा) मैदान येथून सुरु झालेल्या नववर्ष स्वागत यात्रेत राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, महायुतीचे उमदेवार विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, युवा सरचिटणीस दीपेश म्हात्रे, ग्रामीण अध्यक्ष महेश पाटील, संतोष चव्हाण, प्रकाश माने, जनार्धन म्हात्रे, संजय पावशे, रणजित जोशी, गजानन व्यापारी, सोनू सुरवशे, मंदार हळबे, राहुल दामले, समीर चिटणीस, नंदू परब, शशिकांत कांबळे, शैलेश धात्रक यांसह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या यात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वैशाली दरेकर यादेखील सहभागी झाल्या होत्या. नववर्ष शोभायात्रेत मराठी कलाकार देखील सहभागी झाल्याचे पाहताच डोंबिवलीकरांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
डोंबिवलीकरांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या. वेगवेगळ्या चित्ररथातून एक वेगळे मार्गदर्शन लोकांना लाभत होते. लोकशाहीचा आधारस्तंभ मतदानाचं महत्व, त्यानंतर पाणी वाचवा, पर्यावरण, सोशल मीडिया अशा विविध विषयांवर चित्ररथ भागशाळा मैदानापासून निघाले होते. तरुणाईचा उदंड उत्साह, लेझीम व झांज पथक, तसेच तलवारबाजी, दांडपट्टा प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती. 'सुट्टी आहे म्हणून सिनेमा पाहायला वेळ मिळतो, पण मतदान का टाळता' असा बॅनर घेऊन दोन लहान मुले शोभायात्रेत सहभागी झाले होते. भाजपा, शिवसेना यांच्याकडून शोभायात्रेतील सहभागी डोंबिवलीकरांचे फुलपुष्पांनी स्वागत करण्यात येत होते. 
पूर्वेकडील 'आगरी युथ फोरम ग्लोबल कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स' च्या वतीने गुलाब वझे, सुरेश जोशी यांनी स्वागत यात्रेतील नागरिकांना नववर्षाच्या  शुभेच्छा दिल्या.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत