डोंबिवली/निळजे : गुढी पाढव्याला निळजेत साई सिटी येथे 'श्री जगन्नाथ कल्चरल आणि एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट' चा पहिला वर्धापन दिन उत्स्फूर्तपणे ठाणे जिल्ह्यातील विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात सपन्न झाला. त्याप्रसंगी विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 'साई सिटी गृहप्रकल्प' येथे जगन्नाथ मंदिर वर्धापन दिनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संतोष दीक्षित व विरेंद्र सिंग यांनी त्यांचा विशेष सन्मान केला. मागील वर्षी साई सिटी गृहप्रकल्प निर्माण होत असलेल्या ठिकाणी भगवान श्री जगन्नाथ यांच्या भव्य मंदिर उभारण्यासाठी साई सिटीचे डायरेक्टर संतोष दीक्षित व वीरेंद्र सिंग यांनी जागा उपलब्ध करून दिली होती. त्या ठिकाणी भगवान श्री जगन्नाथांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार असून भाविकांना एक लहान मंदीर दर्शनासाठी बांधण्यात आले आहे. लवकरच यावर्षी भव्य मंदिर या ठिकाणी उभारण्यात येणार असून मंदिर निर्माणाचे काम सुरू होईल अशी माहिती मंदिर ट्रस्टचे एस.एम गौडा यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
या वर्षी 'श्री जगन्नाथ कल्चरल आणि एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट' चा पहिला वर्धापन दिन असल्याने आज गुढी पाढव्याच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महापूजा, महाप्रसाद भंडारा, इत्यादी कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास सुमारे ५ हजाराहून अधिक भाविक सकाळपासून जगन्नाथ मंदीरात दर्शनासाठी येऊन महाप्रसाद तसेच भंडाऱ्याचा लाभ घेऊन गेले. सकाळच्या सत्रातील महापूजेला 'साई सिटी'चे डायरेक्टर विरेंद्र सिंग व एस. एम गौडा व पाटील कुटुंबातील विवाहित नव्या जोडीला मान मिळाला. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान डोंबिवली शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, माजी आमदार सुभाष गणू भोईर, माजी नगरसेवक महेश बाबुराव पाटील, नगरसेवक बाबाजी पाटील, निळजे गावचे माजी सरपंच रवींद्र धर्मा पाटील,भगवान शांताराम पाटील, रोहित गुलाब भोईर तसेच पंचशील सामाजिक संस्थेचे रवींद्र कांबळे, विनायक साळवी, विजय सावंत, बबन कांबळे, विलास कांबळे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान 'साई सिटी'चे डायरेक्टर संतोष दिक्षित, व 'जगन्नाथ मंदिर ट्रस्ट'चे एस.एम गौडा व निराकार साहू यांनी केला.
सायंकाळच्या सत्रात कार्यक्रमास विशेष आमंत्रित कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, ग्रामीण अध्यक्ष महेश पाटील, नितीन पाटील, अर्जुनभाई पाटील, प्रणव गणपतशेठ गायकवाड, कैलास म्हात्रे, गजानन मोतीराम पाटील, सुभाष अनंता पाटील, हरीश भोईर, मुकेश भोईर, सतरपाल सिंग, अनिल गजानन पाटील, सुमन साहु, शंभु साहु, सागर जेधे, महेन्द्र धर्मा पाटील, डॉ.जनार्धन म्हात्रे, रमेश मोरे, सुभाषचंद्र नेहरा यासह विविध संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा