डोंबिवली, दि.२० : भारताचे नागरिक म्हणून सर्व भारतवासियांची जबाबदारी आणि कर्तव्य शासनाने नियमबद्ध केली आहेत. 'सर्व धर्म समभाव' ही भावना प्रत्येकाच्या ठायी असली पाहिजे, मी नसून आम्ही या भावनेने देशात एकात्मता निर्माण करू, ह्यासाठी प्रतिज्ञतेची गरज आहे. हीच प्रतिज्ञा, मतदान करणे ह्याची शपथ घेणे गरजेचे आहे. मतदान करणे हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत हक्क व अधिकार आहे. प्रत्येक मतदान करणारा मतदार हा 'राजा' आहे. भारत सरकारने सर्व शाळा, महाविद्यालय परिसरात मतदारांनी घ्यावयाची शपथ, संविधान प्रतिज्ञा घ्यावी असे आवाहन केले.
'जे एम एफ' संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी देखील जन गण मन शाळा, वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांसह प्रतिज्ञा घेतली. हिंदी आणि मराठी ह्या दोन्ही भाषेतून डॉ. राजकुमार कोल्हे यांनी प्रतिज्ञा वाचली व त्यांच्या मागे सर्व 'जे एम एफ' चे विद्यार्थी व शिक्षकांनी उजवा हात छातीवर ठेऊन प्रतिज्ञा म्हंटली.
राज्यात आणि देशात मतदानाचे वारे सगळीकडेच घोंगावत असताना मतदार हा जागृत असलाच पाहिजे, कर्तव्य, शासनाचे नियम आणि जबाबदाऱ्या ह्या जबाबदारीने पार पाडणे हे प्रत्येक मतदार नागरिकाचे अधिकृत कर्तव्य आहे असे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगून मतदान जरुर करा असे सगळ्यांना आवाहन केले. व स्वतः प्रतिज्ञाबद्घ राहून सर्व उपस्थित वर्गाला प्रतिज्ञा चे महत्व सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा