BREAKING NEWS
latest

उधार घेतलेले पैसे परत न केल्याने फिर्यादीची रिक्षा घेऊन फरार झालेल्याच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा घटक-३ कल्याणच्या पोलीसांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दि. १३/०४/२०२४ रोजी गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणच्या नेमणुकीतील पोहवा. अनुप कामत, पोना. सचिन वानखेडे, पोशि. उमेश जाधव हे परिमंडळ-३, कल्याण मधील दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपीचा समांतर शोध घेत असताना डोंबिवली पो.स्टे. गु.र.नं. ४४६/२०२४ भा.दं.वि. कलम ३९२,३२३, ५०४ या गुन्ह्यातील पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी हर्ष उर्फ रोहित शिवप्रकाश तिवारी (वय: २१ वर्षे), धंदा: नोकरी, राहणार सत्गुरू हॉटेलच्या बाजुला असलेल्या चाळीतील भाडयाचे खोलीत, एस.एम.जी. शाळेजवळ, दिवा (पुर्व) जि. ठाणे यास तांत्रीक तपास व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून शोध घेवुन त्यास नमस्कार ढाबा, आडीवली-ढोकाळी, डोंबिवली (पुर्व) येथुन २२:३० वाजता ताब्यात घेण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की दिनांक ०२/०४/२०२४ रोजी रात्रौ १०:०० वा.चे सुमारास नांदिवली येथील शहिद हेमंत करकरे रिक्षा स्टॅण्ड, श्री स्वामी समर्थ मठासमोर, डोंबिवली पुर्व, येथे फिर्यादी हे त्यांची ऑटो रिक्षा नं. एमएच ०५/बीजी ९७६० ही घेवून प्रवासी भाड्याची वाट पाहत असतांना रोहित तिवारी हा सदर ठिकाणी येवून त्याने फिर्यादी यांचे कडे घेतलेल्या उधारीचे पैसे मागितले असता त्यास त्यांनी नंतर देतो असे सांगितले. त्या गोष्टीचा राग येवून त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताचे चापटीने मारहाण केली व त्यांचे ताब्यातील ऑटोरिक्षा ही जबरस्तीने हिसकावून चोरुन घेवून गेला. म्हणून फिर्यादी यांची रोहित तिवारी याच्या विरुध्द तक्रार होती.

सदर फरार आरोपी हर्ष उर्फ रोहित शिवप्रकाश तिवारी याची व त्याचे विरूध्द दाखल असलेल्या नमुद गुन्ह्याबाबत पडताळणी केली असता तो सदर गुन्ह्यात डोंबिवली पोलीसांना पाहिजे असल्याची खात्री झाली असुन त्यास रिपोर्ट सोबत हजर केले आहे. त्याचेवर पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत