BREAKING NEWS
latest

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर खंडणी विरोधी पथक व विशेष कृती दल, गुन्हे शाखा, ठाणे शहर कडून सराईत गुन्हेगारास अग्नीशस्त्र साठ्यासह शिताफीने केले अटक..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे दि.२३ : लोकसभा निवडणुक प्रक्रीया २०२४ कायदा व सुव्यवस्थेस बाधा न येता शांततेत पार पडावी याकरीता मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना जास्तीत जास्त अवैध शस्त्र, अंमली पदार्थ विरोधी कारवाया करणे बाबत सक्त आदेश दिले आहेत. सदर आदेशाची अंमलबाजवणी करण्याच्या अनुशंगाने दिनांक १८.०४.२०२४ रोजी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर प्रयत्नषील असताना सपोनि. सुनिल तारमळे व पोउनि. विजयकुमार राठोड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शंभु महतो नावाचा इसम त्याचेकडे मोठया प्रमाणावर अवैध अग्नीशस्त्र, काडतुसे तसेच  गावठी कट्टे घेवुन विक्रीकरीता साकेत रोड, राबोडी, ठाणे येथे येणार आहे.
सदर बातमीच्या अनुषंगाने सपोआ. शेखर बागडे, विशेष कृती दल, गुन्हे शाखा, ठाणे शहर व महीला पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने साकेत रोड, राबोडी, ठाणे पश्चिम येथे सापळा रचला असता शंभु सुरेश महतो (वय: ३५ वर्षे) धंदा: बेकार, राहणार. टागोर नगर विक्रोळी पुर्व, मुंबई मुळ गाव - बिहार, हा अवैध रित्या अग्निशस्त्रासह मा.पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचा भंग करीत असताना सापडला असता  त्याच्या विरुद्ध  राबोडी पोलीस स्टेशन गु.रजि. क्र. ४५४/२०२४  शस्त्र अधिनियम कलम. ३, २५(१ब)(अ) सह महा.पो.का.कलम ३७(१)१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाकडून आरोपीचा दिनांक २५/०४/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर आहे.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर  आरेापीकडून खंडणी विरोधी पथकाने एकूण ४ पिस्टल, २ गावठी कट्टे, १ मॅगझीन व १८ जिवंत काडतुसे असे एकूण ३,४०,०००/- रूपये किंमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीने  वरील अग्नीशस्त्र साठा नेमका कोणत्या कारणासाठी आणला होता याबाबत पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे करीत आहेत. पोलीसांनी केलेल्या तपासात सदर आरोपी हा गुन्हेगारीच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरुद्ध रबाळे पोलीस स्टेशन, नवी मुंबई येथे खूनाचा गुन्हा दाखल असुन तो जामीनावर बाहेर असल्याचे आढळुन आले आहे.
 
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त,(गुन्हे), पंजाबराव उगले, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे), शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे,(शोध -२), गुन्हे शाखा, ठाणे शहर, सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे, विषेश कार्य दल, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शना खाली खंडणी विरोधी पथकातील मपोनि. वनिता पाटील, सपोनि. श्रीकृष्ण गोरे, सपोनि. भूषण कापडणीस, सपोनि. सुनिल तारमळे, पोउनि. विजयकुमार राठोड, सपोउनि. सुभाश तावडे, कल्याण ढोकणे, संजय बाबर, पोहवा. सचिन शिंपी, योगीराज कानडे, संजय राठोड, गणेश गुरसाळी, मपोहवा. शीतल पावसकर, मपोशि. मयुरी भोसले, पोशि. तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, विनोद ढाकणे चापोना. भगवान हिवरे यांनी यशस्वीपणे केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत