BREAKING NEWS
latest

कल्याण लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली दि.०३: कल्याण डोंबिवली पालिकेच्या माजी नगरसेविका वैशाली दरेकर-राणे यांना कल्याण लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बुधवाऱी ३ तारखेला  उमेदवारी जाहीर केली. २००९ साली दरेकर यांनी १ लाखापेक्षाही जास्त मते मिळवली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आता वैशाली दरेकर यांची शिवसेना (शिंदे गट) चे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी लढत होणार आहे.

वैशाली दरेकर यांनी शिवसेना पक्ष सोडून २००९ साली मनसेत प्रवेश केला होता. कल्याण डोंबिवली पालिकेत २०१० साली दरेकर मनसेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. विरोधी पक्षनेते पद आणि  महिला बालकल्याण समितीचं सभापती पद देखील दरेकर यांनी भूषविले होते. मनसेमध्ये त्यांनी प्रदेश पातळीपर्यंत कामं केले होते. शिवसेना व मनसेमध्ये असताना वैशाली दरेकर यांनी अनेक आंदोलने केली व उपोषणांमध्येही त्या पुढे होत्या.२००९ च्या लोकसभा निवडणुकीत वैशाली दरेकर यांनी शिवसेनेचे आनंद परांजपे यांच्या विरुध्द मनसेकडून निवडणूक लढविली होती. त्यांना एक लाख दोन हजार ६३ मते त्यावेळी मिळाली होती. यंदा त्यांच्यासमोर मोठे आव्हान असून विध्यमान खासदार श्रीकांत शिंदेपुढे त्या किती तग धरतात ते पाहण्यासारखे आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत