BREAKING NEWS
latest

आदित्य ठाकरेंची निवडणुकीत माझ्या समोर लढत देण्याची हिम्मत नाही - खासदार डॉ.श्रीकांत शिंदे


प्रतिनिधी: अवधुत सावंत


डोंबिवली ०६ : निवडणूक जवळ येऊन ठेपली असताना राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून मोठी मोठी वल्गना करणारे, या मतदार संघात लढू असे म्हणणारे चेहरे ते गेले कुठे ? आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई हे या मतदार संघात का उभे राहिले नाही ? स्थानिक कार्यकर्त्यांना लढायला उभे केले. याचे असे आहे कि,`तूम लढो हम कपडे संभालते है', अशी भूमिका त्यांची आहे. येथील विकास कामे पाहून त्यांची या मतदार संघात उभे राहण्याची हिम्मत झाली नाही, येथील असे विकासाचे धोरण अनेक वर्षापासून आहे असा टोला विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज लगावला.
कल्याण लोकसभा मतदार संघासाठी आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई, सुषमा अंधारे, केदार दिघे, सुभाष देसाई तसेच स्थानिक भूमिपुत्र संतोष केणे यांची नावे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विचारात घेतली जातील अशी चर्चा होती. ३ तारखेला शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर झाली. याबाबत शिवसेनेचे विद्यमान संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मोठी मोठी वल्गना करणारे, या मतदार संघात लढू असे म्हणणारे चेहरे होते ते गेले कुठे ? आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई हे या मतदार संघात का उभे राहिले नाहीत ? स्थानिक कार्यकर्त्यांना लढायला उभे केले. `तूम लढो हम कपडे संभालते है`अशी भूमिका त्यांची आहे. येथील विकास कामे पाहून त्यांची या मतदार संघात माझ्या समोर लढत देण्यासाठी उभे राहण्याची हिम्मत झाली नाही. विकासाचे धोरण अनेक वर्षापासून आहे.

पुढे डॉ.श्रीकांत शिंदे म्हणाले, कल्याण लोकसभा मतदार संघातील झालेली विकास कामे पाहून जनता मला मोठया मताधिक्यांनी निवडून आणतील. येथील जनता विकासाच्या बाजूने, महायुतीच्या बाजूने, महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने आहे असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांना आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे. देशाचा विकासाचा आलेख आणखी पुढे घेऊन जायचा आहे त्याकरिता त्यांची हॅटट्रिक होणार यात काहीच दुमत नाही.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत