BREAKING NEWS
latest

कल्याण रेल्वेच्या गुन्हे शाखेकडून मोबाईल चोरी करणारी टोळी गजाआड करत १६ गुन्हे उघडकीस आणून अडीच लाख रुपये किंमतीचे मोबाईल व लॅपटॉप केले हस्तगत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण रेल्वेच्या गुन्हे शाखेकडून बदलापुर-डोंबीवली-टिटवाळा दरम्यान रेल्वे मेल तसेच लोकलमध्ये मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या १६ जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या चोरट्यांकडून १६ गुन्हे उघडकीस आले असून अडीच लाख रुपये किमतीचे मोबाईल व लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत. कल्याण रेल्वे गुन्हे शाखा व डोंबिवली रेल्वे पोलीसांनी ही कामगिरी केली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या महितीनुसार, सत्यराज ओंधुरगा वडारी (२६ वर्षे), कृष्णा गणेश वडारी (२७ वर्षे), शक्तीवेल अवालुडन वडारी (२६ वर्षे), गणेश सेल्वम वडारी (२४ वर्षे), मृर्गेश ऋतुगण वडारी (३३ वर्षे), बालाजी कालीअप्पम वडारी (३९ वर्षे), कार्तीकेत वृतुगण वडारी (३६ वर्षे) अशी अटक केलेल्या सात चोरट्यांची नावे असून ते वेल्लुर, तामिळनाडू येथे राहत असून या टोळीकडून एकुण १६ गुन्हे उघडकीस झाले असून एकुण २,०७,९८७ रुपये किमतीचे ११ मोबाईल फोन व १ लॅपटॉप हस्तगत करण्यात आला आहे. 

सदरची टोळी बदलापुर-डोंबिवली-टिटवाळा दरम्यान रेल्वे मेल तसेच लोकलमध्ये चोऱ्या करत असल्याची माहिती रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  अरशुद्दीन शेख व डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांना मिळाली. पोलीस उप-आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार वपोनि  अरशुद्दीन शेख यांनी या टोळीचा शोध घेतला. १ मे रोजी चोरटे कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र.१ जवळ दिसल्याची माहिती मिळाली असता सदर ठिकाणी गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी चोरट्यांना सापळा लावून पकडले. अटक आरोपींकडून रेल्वे पोलीसांनी एकुण २,०७,९८७  रुपये किंमतीचे ११ मोबाईल फोन व एक लॅपटॉप हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उप-आयुक्त मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरशुद्दीन शेख, पोलीस निरीक्षक रोहित सावंत, डोंबिवली रेल्वे पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, पोलीस अंमलदार राजेंद्र दिवटे, अजय रौंधळ, रविंद्र दरेकर, वैभव जाधव, स्मिता वसावे, पद्मा केंजळे, महेंद्र कर्डिले, रविंद्र ठाकुर, सोनाली पाटील, हितेश नाईक, अजित माने, गोरख सुरवसे, अक्षय चव्हाण, सुनिल मागाडे तसेच डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरी संजय नस्टे, सपोनि सुधीर चौधरी, पोलीस अंमलदार भांडारकर, पाटील, तांत्रीक शाखेचे सपोनि मंगेश खाडे, पोलीस अंमलदार अहिनवे यांनी यशस्वीरित्या बजावली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत